TRENDING:

Mahabhulekh Portal : सातबारा उतारा, फेरफार नोंदी ते प्रॉपर्टी कार्डपर्यंत! महाभूलेख विभागाकडून मोठे बदल, वाचा सविस्तर

Last Updated:
Mahabhulekh Portal : महाभुलेख पोर्टलवरील तांत्रिक अद्ययावत प्रक्रियेनंतर आता सर्व प्रमुख सेवा पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्या आहेत.
advertisement
1/6
सातबारा उतारा, फेरफार नोंदी ते प्रॉपर्टी कार्डपर्यंत! महाभूलेख विभागाकडून मोठे बदल, वाचा सविस्तर
मुंबई : महाभुलेख पोर्टलवरील तांत्रिक अद्ययावत प्रक्रियेनंतर आता सर्व प्रमुख सेवा पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आता कोणत्याही अडथळ्याशिवाय जमिनीशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज घरबसल्या ऑनलाईन पाहता आणि डाउनलोड करता येणार आहेत.
advertisement
2/6
ऑनलाईन ७/१२ उतारा पुन्हा उपलब्ध पोर्टलवर सर्वाधिक वापरली जाणारी ७/१२ (सातबारा) उताऱ्याची सेवा पुन्हा सुरू झाली आहे. नागरिकांना आता डिजिटल स्वरूपात सातबारा उतारा सहज मिळू शकतो.
advertisement
3/6
फेरफार (Mutation) माहिती तपासण्याची सुविधा -  जमिनीच्या खरेदी-विक्री किंवा वारसा हक्काशी संबंधित फेरफार नोंदी देखील आता ऑनलाईन तपासता येणार आहेत. यामुळे मालकी हक्काबाबतची माहिती अधिक पारदर्शक झाली आहे.
advertisement
4/6
जमिनीचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध जुने तसेच नवीन जमिनीचे सर्व महत्त्वाचे अभिलेख पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही.
advertisement
5/6
घरबसल्या सेवा, वेळेची बचत महाभुलेख पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना आता तहसील कार्यालयात न जाता मोबाईल किंवा संगणकावरून सर्व माहिती मिळणार आहे. यामुळे वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे.
advertisement
6/6
महत्त्वाची माहिती आणि अधिकृत दस्तऐवज मिळवण्यासाठी नागरिकांनी महाभुलेखच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ पोर्टलवरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून सेवा पुन्हा कार्यान्वित झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Mahabhulekh Portal : सातबारा उतारा, फेरफार नोंदी ते प्रॉपर्टी कार्डपर्यंत! महाभूलेख विभागाकडून मोठे बदल, वाचा सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल