TRENDING:

Ashok Kharat Case: अशोक खरातचे कारनामे संपता संपेना, ऑफिस-बंगल्यावरील छाप्यानंतर पोलिसही चक्रावले

Last Updated:

Ashok Kharat Case : भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खरातच्या कार्यालयावर आणि बंगल्यावर मारलेल्या छाप्यानंतर पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाच्या गोष्टी लागल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खरातच्या कार्यालयावर आणि बंगल्यावर मारलेल्या छाप्यानंतर पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाच्या गोष्टी लागल्या आहेत. भोंदू खरातचे कारनामे पाहून पोलिसही चक्रावले आहेत. नाशिक येथील खरातच्या 'तृप्तबाला' बंगल्यावर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अशोक खरातचे कारनामे संपता संपेना, ऑफिस-बंगल्यावरील छाप्यानंतर पोलिसही चक्रावले
अशोक खरातचे कारनामे संपता संपेना, ऑफिस-बंगल्यावरील छाप्यानंतर पोलिसही चक्रावले
advertisement

भोंदू अशोक खरातला अटक केल्यानंतर चौकशीत अनेक गोंष्टी समोर येऊ लागल्या. अशोक खरातने महिलांचे केलेले लैगिंक शोषण केल्याचे समोर आलेच, त्याशिवाय, इतरही घोटाळे समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या घरातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले असून, भक्तांच्या नावावर बनावट बँक खाती उघडून कोट्यवधींचा झोल केल्याचा संशय बळावला आहे.

advertisement

तपासातील धक्कादायक खुलासे

प्राथमिक तपासात खरातने विविध बँकांमध्ये तब्बल १३१ बनावट खाती उघडल्याचे समोर आले आहे. ही खाती प्रामुख्याने नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि पुणे येथील पतसंस्थांमध्ये आहेत.

खरातकडे येणाऱ्या भक्तांकडून 'पूजाविधी' किंवा 'देवदर्शनाच्या' नावाखाली आधार आणि पॅन कार्डच्या झेरॉक्स घेतल्या जात होत्या. या कागदपत्रांचा वापर करून भक्तांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे खाती उघडली गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व बनावट खात्यांवर खरातने स्वतःचे नाव 'वारसदार' (Nominee) म्हणून लावले होते. तसेच, व्यवहारांचे मेसेज खातेदारांना जाऊ नयेत म्हणून स्वतःचाच मोबाईल नंबर या खात्यांना लिंक केला होता.

advertisement

भक्तांची माहिती मिळवण्यासाठी पंटरचा वापर

आपल्यावरील विश्वास वाढवण्यासाठी अशोक खरात भाविकांना त्यांची वैयक्तिक माहिती देत असे. मात्र, ही माहिती एका नेटवर्कमधून खरातकडे येत असे. भक्तांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी खरातने पंटरांचे एक मोठे जाळे विणले होते. श्रीमंत भक्तांना 'टार्गेट' करून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

advertisement

पीडितेच्या जबाबातून फुटले बिंग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

लैंगिक शोषण प्रकरणातील एका पीडितेने दिलेल्या जबाबातून या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाली होती. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. खरातच्या या आर्थिक जाळ्यात काही बँक अधिकारी किंवा पतसंस्थांचे व्यवस्थापक सामील आहेत का, याचा तपास आता SIT (विशेष तपास पथक) करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: अशोक खरातचे कारनामे संपता संपेना, ऑफिस-बंगल्यावरील छाप्यानंतर पोलिसही चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल