TRENDING:

KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये शाहरुख नाराज? सीईओसह किंग खानने घेतली प्लेयर्सची शाळा? व्हायरल Video ने भूवया उंचावल्या!

Last Updated:

Shah Rukh Khan in KKR dressing Room : शाहरुख खान टीमच्या कामगिरीवर नाराज असल्याचं दिसत होतं. त्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण शाहरुख काहीही झालं तरी कधी खेळाडूंना एका शब्दाने बोलत नाही, हे सर्वांनाच चांगलंच माहिती आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shah Rukh Khan with KKR CEO Venky Mysore : कोलकाताच्या ईडन्स गार्डन्सवर पंजाब किंग्ज आणि केकेआर यांच्यात सामना खेळवला जाणार होता. पण 22 बॉल झाल्यानंतर लगेच पावसाने हजेरी लावली अन् सामना रद्द करण्याची वेळ आली. हा सामना पाहण्यासाठी स्वत: किंग खानने हजेरी लावली होती. शाहरुख यावेळी मॅच पाहण्यासाठी आला होता पण पावसाने सर्वांची निराशा केली. मात्र, शाहरुख यावेळी केकेआरच्या ड्रेसिंग रुममध्ये नाराज असल्याचं दिसून आला.
Shah Rukh Khan in KKR dressing Room
Shah Rukh Khan in KKR dressing Room
advertisement

सीईओ वेंकी मैसूर यांच्यासोबत गप्पा

केकेआरचा स्टार बॉलर हर्षित राणा याच्यासह किंग खान याने हजेरी लावली होती. पण पावसाने गेम केला. पाऊस सुरू असताना शाहरुख खान याने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली. त्यावेळी शाहरूख खान यावेळी सीईओ वेंकी मैसूर यांच्यासोबत गप्पा मारताना दिसला. यावेळी शाहरुख खान टीमच्या कामगिरीवर नाराज असल्याचं दिसत होतं. त्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण शाहरुख काहीही झालं तरी कधी खेळाडूंना एका शब्दाने बोलत नाही, हे सर्वांनाच चांगलंच माहिती आहे.

advertisement

शाहरुख खान टीमच्या कामगिरीवर नाराज

शाहरुख खान याने खेळाडूंची शाळा घेतली की काय? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. आत्तापर्यंत केकेआरने दोन्ही सामने गमावल्याने शाहरुख नाराज दिसत होता, असंही काही नेटकरी म्हणतायेत. तसेच शाहरुख आल्यानेच केकेआरचं पाईंट्स टेबलचं खातं उघडलं, असा टोला देखील नेटकरी लगावताना दिसतायेत. त्यामुळे शाहरुखचा पायगूण चांगला होता, अशी चर्चा सुरू झालीये.

advertisement

advertisement

टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय फसला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

तीनवेळा चॅम्पियन राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. आपल्या सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस गमावल्यानंतर सोमवारी पंजाब किंग्सविरुद्धच्या मॅचमध्येही त्यांची स्थिती नाजूक होती. ईडन गार्डन्सवर टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय फसला आणि फिन ॲलन व कॅमेरून ग्रीन स्वस्तात बाद झाले. मात्र, 3.4 ओव्हरचा खेळ झाल्यावर पावसाने हजेरी लावली आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मॅच रद्द करावी लागली.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये शाहरुख नाराज? सीईओसह किंग खानने घेतली प्लेयर्सची शाळा? व्हायरल Video ने भूवया उंचावल्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल