Aajache Rashibhavishya: हात लावाल त्याचं सोनं होईल, संकटे वाट सोडतील, फक्त मंगळवारी ‘या’ चुका नको, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी मंगळवारी चांगली बातमी मिळेल. तुमच्या नशिबात काय? हे आजचं राशीभविष्य पुण्यातील ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असून अनेक उत्तम योग जुळून येत आहेत. प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. कोणत्याही गोष्टीची काही घाई करू नका. रिझल्ट मिळायला वेळ लागतो हे लक्षात ठेवा. आर्थिक चणचण दूर होईल. प्रवासाचा योग आहे.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला संयमाने वागावं लागेल. संयम न ठेवता एखादी कृती केली तर खूप मोठे नुकसान करू शकते ही बाब लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या कामांवर फोकस ठेवा. तुम्हाला कामात यश नक्की मिळेल. कुटुंबात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. चांगल्या संधीचा फायदा उचला.
advertisement
3/13
मिथुन राशीचे ग्रहमान अनुकूल आहेत. त्यामुळे तुम्हाला कामात यश खूप लवकर मिळणार आहे. निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबामध्ये सकारात्मक वातावरण असेल. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु तुम्हाला कामामध्ये फोकस ठेवणं आवश्यक आहे. तरच तुमची कामे मार्गी लागतील. वरिष्ठ कामात चुका काढतील. त्या चुकांना स्वीकारा आणि सुधारणा करा. स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
advertisement
5/13
सिंह राशीच्या व्यक्तींना आज कामाचा ताण जाणवू शकतो. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नव्या जबाबदारीमध्ये भर पडू शकते. पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाइफ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी कामच करा. काही प्रमाणात अस्थिरता जाणवेल. जास्त विचार न करता कामावर फोकस करा.
advertisement
6/13
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा ठीक आहे. आज कामाची धावपळ असेल. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्यम धनसंपदा हे गोष्ट लक्षात ठेवा. कन्या राशीचा स्वामी बुध षष्ठ स्थानात येऊन सूर्याबरोबर आहे. त्यामुळे जास्त धावपळ करावी लागेल. परंतु याचे रिझल्ट सकारात्मक मिळतील.
advertisement
7/13
तुळ राशीच्या व्यक्तींना आज कौटुंबिक आणि कामकाजातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवल्यास गैरसमज टळतील. आरोग्याच्या दृष्टीने डोळे आणि त्वचेची काळजी घ्या.
advertisement
8/13
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असणार आहे. अचानक आनंदाची बातमी मिळू शकते. एखादी नवीन सुरुवात करण्याची असल्यास आजचा दिवस उत्तम ठरेल. जवळच्या व्यक्तीसोबत असणारे गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कामासोबत कुटुंबालाही वेळ द्या.
advertisement
9/13
धनु राशीच्या व्यक्तींना आज मनात विचार वाढू शकतात. काही गोष्टींबाबत गोंधळ राहील, त्यामुळे शांत राहणे गरजेचे आहे. पूजा किंवा ध्यान केल्यास मनाला दिलासा मिळेल. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेसंबंधात भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. नवीन संपर्कातून लाभ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि कमजोरी जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या.
advertisement
10/13
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज समाजात मानसन्मान मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचा योग आहे. कुटुंबात देखील सकारात्मक वातावरण राहील.
advertisement
11/13
कुंभ राशीच्या व्यक्तींना आज नवीन संधी मिळू शकतात. एखादा नवीन प्लॅन किंवा काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. मित्रांकडून मदत आणि सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत पैसे येतील, पण खर्चही वाढू शकतो, त्यामुळे नियोजन करा. नातेसंबंधात जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. आरोग्याच्या दृष्टीने तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
advertisement
12/13
मीन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस म्हणजे सोने पे सुहागा पद्धतीचा असणार आहे. मीन राशीचा स्वामी गुरु शुभ स्थितीत असल्यामुळे प्रगतीसाठी अनेक मार्ग खुले होतील. त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा उचला. अचानकपणे छोट्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, पण चिंता नसावी. यातून तुम्ही मार्ग काढाल.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: हात लावाल त्याचं सोनं होईल, संकटे वाट सोडतील, फक्त मंगळवारी ‘या’ चुका नको, आजचं राशीभविष्य