TRENDING:

'दृश्यम'पेक्षा 100 पट जास्त सस्पेन्स! OTT वर टॉप ट्रेंडच्या यादीत आहे ही क्राईम थ्रीलर फिल्म

Last Updated:
OTT Crime Thriller Film : सुरुवातीला सामान्य वाटणारी ही फिल्म अचानक थ्रीलर बनते. त्यातील सस्पेन्स दृश्यमपेक्षाही भारी आहे.
advertisement
1/9
'दृश्यम'पेक्षा 100 पट जास्त सस्पेन्स! OTT वर टॉप ट्रेंडच्या यादीत आहे ही क्राईम थ्रीलर फिल्म
क्राईम थ्रीलर सस्पेन्स फिल्म म्हटलं की बऱ्याच जणांसमोर अजय देवगणची दृश्यम फिल्म येते. कित्येकांच्या तोंडावर याच फिल्मचं नाव सगळ्यात आधी येईल. पण दृश्यमपेक्षाही भारी अशी क्राईम थ्रीलर फिल्म जी ओटीटीवर ट्रेंडिंग आहे. ज्याने सस्पेन्सचे सगळे रेकॉर्ड मोडलेत असं म्हणायला हरकत नाही.
advertisement
2/9
कोणतंही बिग बजेट नाही, गाजावाज नाही. पण या फिल्मने रिलीज होताच ओटीटी विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ही फिल्म प्रेक्षकांना फक्त खिळवून ठेवत नाही, तर एक सामान्य माणूस खुनी कधी आणि का बनतो, यावर विचार करायलाही भाग पाडते.
advertisement
3/9
हा फिल्मची स्टोरी एका तुरुंगाभोवती फिरते. शंभूनाथ मिश्रा नावाचं पात्र. मध्य प्रदेशातील शिवपुरी तुरुंगात तैनात असलेला एक पोलीस आहे. त्याच्या पत्नीचं निधन झालं आहे आणि त्याचा मुलगा परदेशात राहतो.
advertisement
4/9
शंभूनाथने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मोठं कर्ज घेतलेलं असतं. ते फेडण्यासाठी त्याचा पगार पुरेसा नसतो म्हणून तो तुरुंगात भाजीपाला पिकवतो आणि ते बाहेर विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवतो.
advertisement
5/9
दरम्यान त्याच तुरुंगात मंजू सिंग नावाचं पात्र दोन खुनांसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतं. या सगळ्यात आमदाराचा भाऊ केशव तुरुंगात येतो, जो इतर कैद्यांना मारहाण करत असतो. एकेदिवशी तो बॅरेकमधून गायब होतो. त्याचा शोध सुरू होतो, पण तो सापडत नाही. नंतर संपूर्ण कथेला एक वेगळं वळण मिळतं. 
advertisement
6/9
चित्रपट सुरुवातीला साधा वाटतो पण नंतर तो अचानक थ्रीलरमध्ये बदलतो. चित्रपटातील सस्पेन्स 'दृश्यम'लाही मागे टाकतो. याचा क्लायमॅक्स तुम्हाला थक्क करून सोडेल.
advertisement
7/9
'दृश्यम'मध्ये विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगण पोलिसांना चकमा देण्याचा कट रचताना दिसतो पण या फिल्ममध्ये कोणताही हिरो नाही उलट दोन सामान्य व्यक्तींची असहायता आणि त्यांची भयानक कृत्ये दाखवली आहेत. 
advertisement
8/9
ही फिल्म आहे वध 2. ज्यात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या भूमिका आहेत. 3 एप्रिल रोजी ही फिल्म ओटीटीवर रिलीज झाली आणि लगेच या फिल्मने टॉप ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवलं आहे.
advertisement
9/9
त्यामुळे तुम्ही मर्डर मिस्ट्री, सस्पेन्स आणि थ्रीलर्सचे चाहते असाल, तर 'वध 2' तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही फिल्म तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'दृश्यम'पेक्षा 100 पट जास्त सस्पेन्स! OTT वर टॉप ट्रेंडच्या यादीत आहे ही क्राईम थ्रीलर फिल्म
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल