TRENDING:

भारताचा कट्टर दुश्मन, तरीही पाकिस्तानात TOP 10 मध्ये 4 भारतीय सिनेमे; 'धुरंधर'ला मागे टाकून 'ही' फिल्म ठरली नंबर 1

Last Updated:
Indian films feature in Pakistan's Top 10 list: एक डेटा समोर आला आहे, ज्यानुसार भारताचा कट्टर शत्रू आणि शेजारी असलेल्या पाकिस्तानात चार भारतीय फिल्म्स टॉप ट्रेंडिंग आहेत.
advertisement
1/7
पाकिस्तानात TOP 10 मध्ये 4 भारतीय सिनेमे; 'धुरंधर'ला मागे टाकून 'ही' फिल्म ठरली नंबर 1
ओटीटी </a>आल्यानंतर या गोष्टीचा प्रत्यय अधिकच येऊ लागला आहे. आज आपण घरबसल्या वेगवेगळ्या देशातील सिनेमे आणि सीरिज पाहू शकतो." width="1200" height="900" /> कलेला भाषा आणि सीमांचं बंधन नसतं, हे खरंच आहे. अशातच आता ओटीटी आल्यानंतर या गोष्टीचा प्रत्यय अधिकच येऊ लागला आहे. आज आपण घरबसल्या वेगवेगळ्या देशातील सिनेमे आणि सीरिज पाहू शकतो.
advertisement
2/7
इतर देशातील प्रेक्षकही आपल्या देशातील सिनेमे आणि सीरिजचा आनंद घेत आहेत. पण अशातच एक डेटा समोर आला आहे, ज्यानुसार भारताचा कट्टर शत्रू आणि शेजारी असलेल्या पाकिस्तानात चार भारतीय फिल्म्स टॉप ट्रेंडिंग आहेत.
advertisement
3/7
राजकीय पातळीवर कितीही वाद असले तरीही पाकिस्तानी प्रेक्षकांमधील भारतीय सिनेमांची क्रेझ कमी झालेली नाही, हेही तितकंच खरं. पाकिस्तानात सध्या ट्रेंडिंग असलेल्या भारतीय फिल्म्स कोणत्या आहेत, पाहूया.
advertisement
4/7
पाकिस्तानमध्ये सध्या नेटफ्लिक्सवर अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' हा क्राईम थ्रिलर चित्रपट पहिल्या क्रमांकावर धुमाकूळ घालत आहे. जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित झालेल्या, क्राईम आणि सस्पेन्सचा तडका असलेल्या या चित्रपटाला पाकिस्तानी प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळत आहे.
advertisement
5/7
एकीकडे रणवीर सिंहचा 'धुरंधर: द रिवेंज' थिएटरमध्ये रेकॉर्ड मोडत असताना, पाकिस्तानमध्ये या फिल्मचा पहिला भाग म्हणजेच 'धुरंधर' सध्या तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. आदित्य धर यांच्या या चित्रपटातील जबरदस्त ॲक्शन आणि थ्रिलरने पाकिस्तानी चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.
advertisement
6/7
सनी देओल आणि वरुण धवनच्या 'बॉर्डर २' या मल्टिस्टारर वार ड्रामाने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये पाचव्या क्रमांकावर आपलं स्थान पक्कं केलं आहे.
advertisement
7/7
२०१८ मध्ये आलेला आलिया भट्टचा 'राझी' हा स्पाय-थ्रिलर चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. हा चित्रपट १० व्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भारताचा कट्टर दुश्मन, तरीही पाकिस्तानात TOP 10 मध्ये 4 भारतीय सिनेमे; 'धुरंधर'ला मागे टाकून 'ही' फिल्म ठरली नंबर 1
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल