लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस येत्या 8 एप्रिलपासून दर आठवड्याला धावणार आहे. 13380 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस दर बुधवारी पहाटे 04.55 मिनिटांनी सुटणार आहे. तर, धनबाद जंक्शनवर ही एक्सप्रेस तिसऱ्या दिवशी सकाळी 08.00 वाजता पोहोचेल. तर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस धनबाद वरून दर आठवड्याच्या सोमवारी सुटणार आहे.
advertisement
13379 अप धनबाद ते लोकमान्य टिळक टर्मिनस हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस दर सोमवारी सकाळी 11.00 वाजता सुटेल. तर, मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर ही ट्रेन तिसऱ्या दिवशी दुपारी 01.40 मिनिटांनी पोहोचेल. ही ट्रेन, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी साऊथ, खन्ना बनजारी, बेओहारी, बरगवां, सिंगरुळी, ओबरा डैम, रेनूकूट, गरवा रोड, डाल्टनगंज, लतेहार, टोरी, खलारी, पत्रातू, रांची रोड, बाकरा रोड, चंद्रपुरा, कत्रासगढ या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते धनबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेसची संरचना 2 द्वितीय श्रेणीचे वातानुकूलित डब्बे, 2 तृतीय श्रेणीचे वातानुकूलित डब्बे, 6 वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी डब्बे, 6 स्लीपर डब्बे, 4 जनरल कोच आणि २ जनरेटर डबा अशी रेल्वेच्या डब्यांची रचना असणार आहे. ट्रेन क्रमांक 13380 साठी आरक्षण ०५ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. तिकिटांच्या आरक्षणासाठी प्रवाशांना 'RailOne' ॲपदेखील डाउनलोड करू शकतात.
