'खतरों के खिलाडी 15' आहे की बिग बॉसचं रियुनियन? KKK15 मध्ये दिसणार रिॲलिटी शोचे धुरंधर, नावांवरून पडदा हटला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Khatron Ke Khiladi 15: यंदाच्या KKK15 मध्ये कोणते स्पर्धक एकमेकांना भिडणार आहेत, याबद्दल माहिती समोर आली आहे. दरम्यान, यंदाच्या नव्या सीझनमध्ये बिग बॉस स्पर्धकांची भरणा असल्याचं लक्षात येतंय. Is 'Khatron Ke Khiladi 15' actually a 'Bigg Boss' reunion? Reality TV stalwarts set to appear in KKK 15; Contestants name revealed
advertisement
1/9

'बिग बॉस हिंदी' संपल्यावर प्रेक्षकांना वेध लागतात ते 'खतरों के खिलाडी' या गेम शोचं. अंगावर काटा आणणारे स्टंट्स, अक्राळविक्राळ प्राणी आणि समोर उभा असलेला 'बॉलीवूडचा सिंघम' रोहित शेट्टी हे कॉम्बिनेशनच हटके आहे.
advertisement
2/9
दरम्यान टीव्ही विश्वातील सर्वात गाजलेला स्टंट रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला येतोय. या वर्षी जून महिन्यामध्ये दणक्यात हा शो सुरू होणार असून, दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये यंदाचा थरार रंगणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
advertisement
3/9
या सीझनबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरीही याबाबत सोशल मीडियावर तुफान क्रेझ पाहायला मिळतेय. अशातच यंदाच्या KKK15 मध्ये कोणते स्पर्धक एकमेकांना भिडणार आहेत, याबद्दल माहिती समोर आली आहे.
advertisement
4/9
दरम्यान, यंदाच्या नव्या सीझनमध्ये बिग बॉस स्पर्धकांची भरणा असल्याचं लक्षात येतंय. त्यामुळे हा शो 'खतरों के खिलाडी' आहे की बिग बॉस आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होऊ शकतात, यावर एक नजर टाकूया.
advertisement
5/9
'ये तेरी गलियाँ' फेम अविनाश मिश्रा या पर्वाचा पहिला कन्फर्म स्पर्धक असल्याचं बोललं जातंय. बिग बॉस १८ मधील त्याच्या रोखठोक अंदाजामुळे त्याने रोहित शेट्टीच्या या शोमध्ये आपली जागा पक्की केल्याची चर्चा आहे.
advertisement
6/9
नुकतीच 'बिग बॉस १९' ची ट्रॉफी उचललेला गौरव खन्ना आता उंची आणि आगीशी दोन हात करताना दिसू शकतो. सेलिब्रिटी मास्टर शेफ आणि बिग बॉस जिंकल्यानंतर आता तो 'खतरों के खिलाडी' ही जिंकणार, अशी उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये दिसून येतेय.
advertisement
7/9
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल या दोघी थेट केपटाऊनच्या जंगलात स्टंट करताना दिसण्याची शक्यता आहे.
advertisement
8/9
सोशल मीडिया सेन्सेशन मनिषा राणी आणि रिॲलिटी शोचा किंग मानला जाणारा दिग्विजय राठी देखील यावेळी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत.
advertisement
9/9
याशिवाय इशा मालवीय, अभिषेक बजाज आणि 'द ५०' फेम अरबाज पटेल यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तथापि, स्पर्धकांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नसलं, तरीही ही नावं समोर आल्यानंतर, हे बिग बॉस रियुनियन आहे की 'खतरों के खिलाडी' चं नवीन सीझन असा प्रश्न विचारला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'खतरों के खिलाडी 15' आहे की बिग बॉसचं रियुनियन? KKK15 मध्ये दिसणार रिॲलिटी शोचे धुरंधर, नावांवरून पडदा हटला