TRENDING:

मोगरा महोत्सवानिमित्त सजले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, 51 लाख सुवासिक फुलांचे अर्घ्य अर्पण, Video

Last Updated:

या निमित्ताने गणरायाला तब्बल 51 लाख सुवासिक आणि रंगीबेरंगी फुलांचे अर्घ्य अर्पण करण्यात आले. विविध फुलांनी सजलेले मंदिर आणि फुलांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पाचे मोहक रूप पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोगरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गणरायाला तब्बल 51 लाख सुवासिक आणि रंगीबेरंगी फुलांचे अर्घ्य अर्पण करण्यात आले. विविध फुलांनी सजलेले मंदिर आणि फुलांमध्ये विराजमान झालेल्या बाप्पाचे मोहक रूप पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
advertisement

मोगरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळून गेला होता. मोगऱ्यासह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा, शेवंती, गुलछडी, कमळ, जाई-जुई अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून गाभारा आणि सभामंडप आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण मंदिरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य अर्पण केल्याचा अनुभव भक्तांना येत होता.

advertisement

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाच्या मूर्तीला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची सुंदर आभूषणे परिधान करण्यात आली होती.

advertisement

पुष्पसजावटीसाठी कारागिरांनी दोन दिवसांपासून मेहनत घेतली होती. फुलांच्या नाजूक आणि आकर्षक रचनेमुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. अनेक भाविकांनी या सुंदर सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. सोशल मीडियावरही या महोत्सवाचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

View More

यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला वासंतिक उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन आणि आरतीमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. अशी माहिती कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोगरा महोत्सवाने भक्तांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून, या अनोख्या पुष्पसजावटीने गणेशभक्तांना अविस्मरणीय असा आध्यात्मिक अनुभव दिला.

मराठी बातम्या/पुणे/
मोगरा महोत्सवानिमित्त सजले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, 51 लाख सुवासिक फुलांचे अर्घ्य अर्पण, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल