advertisement

Pune: पुण्यात 'हेराफेरी' स्टाईल स्कॅम, 500 रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग दिली अन् कार घेऊन गेले, नंतर बसला धक्का

Last Updated:

बारामती येथील हुजेब फिरोज बागवान हे त्यांचे मित्र अरबाज शेख यांची चारचाकी गाडी विकण्यासाठी पुण्यात आले होते.

News18
News18
पिंपरी: पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक आहे की नाही, असे प्रश्नचिन्ह उपस्थितीत होतात. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या खेळण्यातील नोटा देऊन 3.50 लाखांची कार लंपास करणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून गुन्ह्यातील कारसह तब्बल ४२.५० लाख रुपये किमतीच्या खेळण्यातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बारामती येथील हुजेब फिरोज बागवान हे त्यांचे मित्र अरबाज शेख यांची चारचाकी गाडी विकण्यासाठी पुण्यात आले होते. आरोपी गणेश ज्ञानदेव ढाकरे याने फोनवरून संपर्क साधून गाडी खरेदी करण्याचा बहाणा केला.  ५ एप्रिल २०२६ रोजी चाकणमधील माणिक चौक इथं ३.५० लाख रुपयांत व्यवहार ठरला. आरोपीने प्लॅस्टिक रॅपरमध्ये गुंडाळलेले ५०० रुपयांच्या नोटांचे ६ बंडल बागवान यांना दिले आणि उर्वरित ५० हजार रुपये नावावर ट्रान्सफर झाल्यावर देण्याचं कबूल केलं.  पैसे देऊन आरोपी गाडीसह पसार झाला.
advertisement
बागवान यांनी नंतर बंडल उघडून पाहिले असता, त्यामध्ये वरची आणि खालची नोट खरी होती, मात्र मधल्या सर्व नोटा खेळण्यातील असल्याचं लक्षात आलं. आता आपली फसवणूक झाल्याचं समजताच बागवान यांनी चाकण पोलीस ठाणे गाठलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तातडीने शोध घेत गणेश ज्ञानदेव ढाकरे आणि समीर दिनकर महल्ले या दोन आरोपींना अटक केली. या दोन्ही भामट्याकडून फसवणूक करून नेलेली चारचाकी गाडी ताब्यात घेण्यात आली.
advertisement
42.5 लाखांच्या बनावट नोटा
एवढंच नाहीतर कारची तपासणी केली असता कारमध्ये ४२.५ लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या खेळण्यातील नोटा, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, नोटांचे बंडल पॅक करण्याचे साहित्य असा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. दरम्यान रोख रकमेचे व्यवहार करताना नागरिकांनी नोटांची नीट खात्री करावी, असं आवाहन चाकण पोलिसांनी केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: पुण्यात 'हेराफेरी' स्टाईल स्कॅम, 500 रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग दिली अन् कार घेऊन गेले, नंतर बसला धक्का
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement