advertisement

इराणमध्ये काही तरी भीषण वाईट होणार, 3 महिन्यांपूर्वी काय झालं होतं? खादेमी-खामेनाईंच्या गुपित भेटीचा धक्कादायक खुलासा

Last Updated:

US-Israel Iran War: इराणचे गुप्तचर प्रमुख मजीद खादेमी यांच्या हत्येने पश्चिम आशियात खळबळ उडाली असून अयातुल्ला खामेनेई यांनी दिलेला '1981 च्या क्रूर कालखंडाचा' इशारा आता सत्यात उतरताना दिसत आहे.

News18
News18
तेहरान: इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता अशा धोकादायक वळणावर पोहोचला आहे जिथे होणाऱ्या विनाशाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. रविवारची रात्र इराणसाठी काळी रात्र ठरली. इस्रायलने 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) चे गुप्तचर प्रमुख मेजर जनरल मजीद खादेमी यांना कंठस्नान घातले. मात्र या हत्येपेक्षाही जास्त चर्चा खादेमी यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी दिलेल्या एका मुलाखतीची होत आहे. ज्यामध्ये त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेत्याचा 'डेथ वॉरंट'सारखा इशारा उघड केला होता.
मृत्यूच्या 10 दिवस आधीचा तो खुलासा
मजीद खादेमी यांनी त्यांच्या मृत्यूच्या अवघ्या 10 दिवस आधी अयातुल्ला अली खामेनेई यांच्या कार्यालयाशी संबंधित एका मीडिया संस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्यांनी खामेनेई यांची भेट घेऊन त्यांना '12 दिवसांच्या युद्धाचा' सविस्तर अहवाल सोपवला होता. त्यावेळी खामेनेई यांनी खादेमींना एक खौफनाक चेतावणी दिली होती. खामेनेई म्हणाले होते, हा काळ 60 व्या दशकासारखा आहे.
advertisement
काय आहे '60 व्या दशकाचा' अर्थ?
इराणच्या इतिहासात वर्ष 1360 (ईसवी सन 1981) हे सर्वात रक्तरंजित आणि क्रूर मानले जाते.
बाह्य आणि अंतर्गत युद्ध: त्या काळात इराण एका बाजूला इराकसोबत युद्ध लढत होता, तर दुसरीकडे देशांतर्गत 'मुजाहिदीन-ए-खल्क' (MEK) सारख्या गटांनी सत्तापालटासाठी शस्त्रे उचलली होती.
भीषण नरसंहार: 1980 च्या दशकात, विशेषतः 1988 मध्ये इराणच्या तुरुंगात बंद असलेल्या हजारो राजकीय विरोधकांना फासावर लटकवण्यात आले होते.
advertisement
अस्तित्वाची लढाई: खामेनेई यांचा इशारा स्पष्ट होता की इराण पुन्हा एकदा अशा स्थितीत आहे जिथे अस्तित्वासाठी कोणत्याही थराला जावे लागेल.
दोन नावांचा रहस्यमयी अधिकारी: मजीद खादेमी
मजीद खादेमी हे इराणच्या गुप्तचर विश्वातील एक अत्यंत रहस्यमयी व्यक्तिमत्व होते. त्यांना 'मजीद हुसैनी' या नावानेही ओळखले जायचे. त्यांची ओळख पटवणे शत्रूसाठी कठीण होते कारण ते अनेकदा आपला पेहराव आणि वागण्याची पद्धत बदलत असत. ते थेट खामेनेई यांच्या आदेशावर काम करत असत आणि त्यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचेही निकटवर्तीय मानले जात असे.
advertisement
10 गुप्तचर संस्थांशी एकाकी झुंज
खादेमी यांनी आपल्या शेवटच्या मुलाखतीत दावा केला होता की, अमेरिकेची CIA आणि इस्रायलची मोसाद (Mossad) यांसह जगातील किमान 10 मोठ्या गुप्तचर संस्था इराणमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायलने तत्कालीन गुप्तचर प्रमुख मोहम्मद काजेमी यांची हत्या केल्यानंतर खादेमी यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
advertisement
इस्रायलचा 'डायरेक्ट हिट' आणि इराणची कोंडी
खादेमी यांच्या हत्येने हे सिद्ध केले आहे की आता इराणची राजधानी तेहरानदेखील सुरक्षित राहिलेली नाही. इस्रायलने तेहरानच्या सुरक्षित गराड्यात शिरून त्या व्यक्तीला मारले जो स्वतः संपूर्ण देशाच्या सुरक्षेचा आणि गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख होता. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आम्ही शत्रूच्या सर्वोच्च नेतृत्वाला निवडून मारू.
advertisement
इराणमध्ये आता पुढे काय?
खामेनेई यांनी 2022 मध्ये एका भाषणात म्हटले होते, 1401 चा देव तोच आहे जो 1360 मध्ये होता. हा इशारा विरोधकांना ठेचून काढण्यासाठी पुन्हा एकदा 1981 सारखी क्रूरता वापरण्याचा होता. मात्र आता स्वतः गुप्तचर प्रमुखच मारले गेल्याने इराणच्या सत्ताधाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासन यंत्रणेतच कोणीतरी 'गद्दार' बसला असल्याचा संशय बळावला असून, इराणसमोर आता 'करा किंवा मरा' अशी स्थिती निर्माण झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणमध्ये काही तरी भीषण वाईट होणार, 3 महिन्यांपूर्वी काय झालं होतं? खादेमी-खामेनाईंच्या गुपित भेटीचा धक्कादायक खुलासा
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement