advertisement

Money : नोटांवरील A, B, C, D चा अर्थ काय? फेक नोटपासून वाचायचंय असेल तर ही माहिती असणं गरजेचं

Last Updated:
बऱ्याच लोकांना वाटतं की हा नोटेच्या सिरीयल नंबरचाच एक भाग आहे किंवा ते एखादं सामान्य चिन्ह आहे. पण खरं तर, हा एक असा सीक्रेट कोड आहे जो त्या नोटेची संपूर्ण कुंडली सांगू शकतो
1/7
सकाळी दूधवाल्याला दिलेली 100 रुपयांची नोट असो किंवा एटीएममधून काढलेली 500 ची कोरी करकरीत नोट... आपण दिवसातून अनेकदा चलनी नोटा हाताळतो. आता व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाईन झाले असले तरी देखील बहुतांश लोक अजूनही अनेकदा व्यवहारामध्ये कॅश वापरतात. नोट हातात आल्यावर आपण ती फाटलेली नाही ना, हे बघतो किंवा गांधीजींचा फोटो आणि त्यावरची सुरक्षा पट्टी नीट आहे ना, हे तपासतो. पण तुम्ही कधी नोटेच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या 'A, B, C, D' किंवा 'E' सारख्या अक्षरांकडे लक्ष दिलंय का?

2/7
बऱ्याच लोकांना वाटतं की हा नोटेच्या सिरीयल नंबरचाच एक भाग आहे किंवा ते एखादं सामान्य चिन्ह आहे. पण खरं तर, हा एक असा सीक्रेट कोड आहे जो त्या नोटेची संपूर्ण कुंडली सांगू शकतो. ही अक्षरं म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची एक सुरक्षा यंत्रणा आहे, ज्याद्वारे नोट नक्की कुठे छापली गेली, हे ओळखता येतं. चला तर मग, तुमच्या खिशातील नोटेवरचा हा कोड नक्की काय सांगतो, ते समजून घेऊया.

3/7
नोटेवरच्या अक्षरांचा अर्थ काय?भारतात चलनी नोटा प्रामुख्याने 5 सरकारी छापखान्यांमध्ये  छापल्या जातात. प्रत्येक केंद्रासाठी आरबीआयने एक विशिष्ट अक्षर ठरवून दिले आहे. तुमच्या नोटेवर जे अक्षर असेल, त्यावरून खालीलप्रमाणे छपाई केंद्र ओळखता येते:

4/7
A – बँक नोट प्रिंटिंग प्रेस, देवास (मध्य प्रदेश): जर तुमच्या नोटेवर 'A' असेल, तर समजा ती देवासमध्ये छापली आहे.B – रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि., सालबोनी (पश्चिम बंगाल): 'B' कोड असलेल्या नोटा बंगालमध्ये तयार होतात.

C – रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि., मैसूर (कर्नाटक): तुमच्या 500 च्या नोटेवर 'C' असेल, तर ती कर्नाटकातून आली आहे.

D – सिक्युरिटी पेपर मिल, होशंगाबाद (मध्य प्रदेश): येथे प्रामुख्याने नोटेसाठी लागणारा कागद आणि काही विशेष नोटांची छपाई होते.

E – करन्सी नोट प्रिंटिंग प्रेस, नाशिक (महाराष्ट्र): महाराष्ट्रातील नाशिक केंद्र 'E' या अक्षराने ओळखले जाते.
A – बँक नोट प्रिंटिंग प्रेस, देवास (मध्य प्रदेश): जर तुमच्या नोटेवर 'A' असेल, तर समजा ती देवासमध्ये छापली आहे.B – रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि., सालबोनी (पश्चिम बंगाल): 'B' कोड असलेल्या नोटा बंगालमध्ये तयार होतात.C – रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि., मैसूर (कर्नाटक): तुमच्या 500 च्या नोटेवर 'C' असेल, तर ती कर्नाटकातून आली आहे.D – सिक्युरिटी पेपर मिल, होशंगाबाद (मध्य प्रदेश): येथे प्रामुख्याने नोटेसाठी लागणारा कागद आणि काही विशेष नोटांची छपाई होते.E – करन्सी नोट प्रिंटिंग प्रेस, नाशिक (महाराष्ट्र): महाराष्ट्रातील नाशिक केंद्र 'E' या अक्षराने ओळखले जाते.
advertisement
5/7
या कोडिंगची गरज का भासली?आरबीआय केवळ नोटा छापत नाही, तर त्यांच्या सुरक्षेवरही अहोरात्र लक्ष ठेवून असते. या कोडिंग सिस्टमचे काही महत्त्वाचे फायदे आहेत:
1. बनावट नोटांची ओळख: जर बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळल्या, तर या कोडमुळे यंत्रणांना हे लगेच कळतं की कोणत्या केंद्राच्या नावाने या नोटा छापल्या जात आहेत. यामुळे तपासाचा वेग वाढतो.

2. गुणवत्ता नियंत्रण: प्रत्येक छापखान्याची कार्यक्षमता आणि छपाईचा दर्जा तपासण्यासाठी हा कोड आरबीआयला मदत करतो.

3. वितरण व्यवस्था: देशाच्या कोणत्या भागात कोणत्या केंद्रातून नोटांचा पुरवठा करायचा, याच नियोजन करण्यासाठी ही अक्षरं महत्त्वाची ठरतात.
या कोडिंगची गरज का भासली?आरबीआय केवळ नोटा छापत नाही, तर त्यांच्या सुरक्षेवरही अहोरात्र लक्ष ठेवून असते. या कोडिंग सिस्टमचे काही महत्त्वाचे फायदे आहेत:1. बनावट नोटांची ओळख: जर बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आढळल्या, तर या कोडमुळे यंत्रणांना हे लगेच कळतं की कोणत्या केंद्राच्या नावाने या नोटा छापल्या जात आहेत. यामुळे तपासाचा वेग वाढतो.2. गुणवत्ता नियंत्रण: प्रत्येक छापखान्याची कार्यक्षमता आणि छपाईचा दर्जा तपासण्यासाठी हा कोड आरबीआयला मदत करतो.3. वितरण व्यवस्था: देशाच्या कोणत्या भागात कोणत्या केंद्रातून नोटांचा पुरवठा करायचा, याच नियोजन करण्यासाठी ही अक्षरं महत्त्वाची ठरतात.
advertisement
6/7
आता नोट अधिक सुरक्षितनोटबंदीनंतर आलेल्या नवीन नोटांमध्ये ही सुरक्षा यंत्रणा अधिकच गुंतागुंतीची आणि मजबूत करण्यात आली आहे. वॉटरमार्क, सुरक्षा धागे, उभरीव छपाई आणि सूक्ष्म अक्षरे यांसारखी अनेक वैशिष्ट्ये नोटेवर असतात. तरीही सामान्य जनतेला सहज ओळखता येईल असे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रिंटिंग कोड अक्षर होय.

7/7
थोडक्यात काय तर, पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या हातात एखादी नोट येईल, तेव्हा कोपऱ्यातलं अक्षर नक्की तपासा. तुम्हाला समजेल की तुमची नोट नाशिकहून आली आहे की मैसूरवरून. ही छोटीशी माहिती तुम्हाला तुमच्या चलनाबद्दल अधिक जागरूक बनवेल.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement