Metro Line 9: दहिसर पूर्व ते काशीगाव भाडं किती? कोणकोणते आहेत मेट्रो स्टेशन; जाणून घ्या एका क्लिकवर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ज्या क्षणाची मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपला आहे. आजपासून मेट्रो लाईन 9 मार्गिका सुरू झाली आहे. या मार्गिकेवर कोणकोणते रेल्वे स्टेशन आहेत. जर तुम्हालाही या मेट्रोतून प्रवास करायचा असेल, तर याचे भाडे किती असेल, जाणून घेऊया...
advertisement
1/6

बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन 9 मार्गिका अखेर आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मेट्रो सुरू होणार असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती. अखेर आजपासून ही मेट्रो सुरू झाली असून यामुळे प्रवाशांसाठी अनेक मार्ग सुखकर झाले आहेत.
advertisement
2/6
मेट्रो 9 चा आजपासून पहिला टप्पा सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये, एकूण चार मेट्रो स्टेशन सुरू झाले आहेत. दहिसर पूर्व, पांडूरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव असे चार मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झालेले आहेत.
advertisement
3/6
मेट्रो 9 वरील या चार मेट्रो स्थानकांसाठी 3 ते 12 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी प्रवाशांना 10 ते 20 रूपये इतकं भाडं एका ट्रीपसाठीचं भरावं लागणार आहे. तर रिटर्नसाठी 20 ते 40 रूपये इतकं भाडं आकारलं जाईल. हे भाडे प्रति व्यक्ती असेल. या मेट्रोमुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
advertisement
4/6
मेट्रो 9 वरील दहिसर पूर्व हे मेट्रो स्थानक मार्गिका 9, 2 अ आणि 7 यांना जोडणारे एक महत्त्वाचे केंद्रस्थान असेल. दहिसर पूर्व येथे उतरल्यावर कॉन्कोर्स लेव्हलवर या आणि मार्गदर्शक फलकांचे अनुसरण करा. स्थानकाच्या बाहेर जाण्याची गरज नाही तसेच पुन्हा सुरक्षा तपासणीचीही आवश्यकता नाही. केवळ काही अंतर चालून तुम्ही सहजपणे मार्गिका बदलू शकणार आहेत.
advertisement
5/6
मिरा-भाईंदरवरून आता थेट अंधेरी पूर्व गाठता येणं सहज शक्य झालं आहे. मेट्रो मार्गिका 9 वरून फक्त एकदा स्थानक बदलून अंधेरी पश्चिम आणि घाटकोपरलाही प्रवाशांना सहज पोहोचता येणार आहे. मुंबई उपनगर आता या मेट्रोमुळे फारच जवळ आले आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवासही अधिकच सुखकर होणार आहे.
advertisement
6/6
दरम्यान, एमएमआरडीए 'मुंबई इन मिनिट्स'च्या माध्यमातून भविष्याची नवी मांडणी करत आहे. याचा फायदा अनेक नोकरदारांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Metro Line 9: दहिसर पूर्व ते काशीगाव भाडं किती? कोणकोणते आहेत मेट्रो स्टेशन; जाणून घ्या एका क्लिकवर