पत्रिकेत मंगळ, झाडाशी लग्न अन् आता 42 व्या वर्षी होणार आई; अभिनेत्रीच्या शॉकिंग खुलाशाने इंडस्ट्री हादरली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Celebrities Beliefs सामान्य नागरिकांप्रमाणेच सिनेकलाकारही अध्यात्म आणि काही उपायांचं पालन करताना दिसतात.
advertisement
1/6

सिनेइंडस्ट्री बाहेरून कितीही ग्लॅमरस आणि मॉडर्न वाटली, तरीही त्यात काम करणाऱ्या कलाकारांची विशिष्ट गोष्टींवर श्रद्धा आणि विश्वास असतात. सामान्य नागरिकांप्रमाणेच हे कलाकारही अडचणींमध्ये अध्यात्म आणि काही उपायांचं पालन करताना दिसतात.
advertisement
2/6
असंच काहीसं अभिनेत्री करिश्मा तन्नासोबत घडलं आहे. नुकतंच करिश्माने ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अशातच तिच्याबद्दलचा एक जुना किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
3/6
२०२२ मध्ये वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर आता लग्नाच्या ४ वर्षांनी करिश्मा ४२ व्या वर्षी मातृत्वाचा अनुभव घेणार आहे. करिअर आणि वय या पलीकडे जाऊन या सुखद बातमीने तिचं कुटुंब सध्या खूप आनंदी आहे. सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
4/6
मात्र, तिचं लग्न होण्याआधी तिला काही विधींना सामोरं जावं लागलं होतं. याबाबतचा खुलासा खुद्द करिश्माने केला आहे. करिश्माने एका जुन्या मुलाखतीत सांगितल्यानुसार, करिश्माच्या कुंडलीत मांगलिक दोष होता. या दोषामुळे करिश्माच्या लग्नात अडथळे येऊ नयेत, म्हणून तिच्या आईने तिचं लग्न थेट झाडाशी लावलं होतं.
advertisement
5/6
करिश्माने सांगितलं, "मी मांगलिक होते, त्यामुळे दोष निवारणासाठी माझ्या आईने माझे लग्न एका झाडाशी आणि एका देवतेशीही लावले होते. तेव्हा मी खूप लहान होते, मला यामागचं कारण कळत नव्हतं. पण माझ्या आईचा या गोष्टींवर प्रचंड विश्वास होता. कुंडली, साडेसाती या सगळ्या गोष्टींची माहिती मला माझ्या आईमुळेच झाली."
advertisement
6/6
करिश्माच्या आईची एकच इच्छा होती की, तिच्या मुलीला एक चांगला जोडीदार मिळावा आणि तिचं वैयक्तिक आयुष्य सुखाचं व्हावं. अखेर करिश्मा आता तिचा पती वरुण बंगेरासोबत आनंदी जीवन जगत असून लवकरच ते एका चिमुकल्याचे पालक बनणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
पत्रिकेत मंगळ, झाडाशी लग्न अन् आता 42 व्या वर्षी होणार आई; अभिनेत्रीच्या शॉकिंग खुलाशाने इंडस्ट्री हादरली