TRENDING:

11 एप्रिलपासून चमकणार नशीब! त्रिग्रही योग 'या' 4 राशींना करणार मालामाल, होणार डबल प्रॉफिट

Last Updated:
एप्रिल 2026 चा महिना ग्रहांच्या अद्भूत हालचालींमुळे चर्चेत आहे. एप्रिलच्या सुरुवातीला मीन राशीत मंगळ, शनी आणि सूर्याची युती होती. मात्र, आता 10 आणि 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री 01 वाजून 20 मिनिटांनी बुद्धीचा कारक बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे.
advertisement
1/7
11 एप्रिलपासून चमकणार नशीब! त्रिग्रही योग 'या' 4 राशींना करणार मालामाल, होणार डबल प्रॉफिट
एप्रिल 2026 चा महिना ग्रहांच्या अद्भूत हालचालींमुळे चर्चेत आहे. एप्रिलच्या सुरुवातीला मीन राशीत मंगळ, शनी आणि सूर्याची युती होती. मात्र, आता 10 आणि 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री 01 वाजून 20 मिनिटांनी बुद्धीचा कारक बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीत सूर्य, शनी, मंगळ आणि बुध यांचा 'चतुर्ग्रही योग' तयार होईल.
advertisement
2/7
14 एप्रिलला सूर्य मेष राशीत गेल्यावरही मीन राशीत मंगळ-बुध-शनि यांचा 'त्रिग्रही योग' सक्रिय राहील. हा दुर्मिळ योग पुढील 21 दिवस 4 राशींच्या जातकांसाठी प्रगतीची दारे उघडणारा आणि 'मालामाल' करणारा ठरेल.
advertisement
3/7
गुरुची राशी असलेल्या मीन राशीत बुध, मंगळ आणि शनी यांचे एकत्र येणे अत्यंत शक्तिशाली मानले जाते. हा योग विशेषतः व्यापार आणि तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी यशाची नवी शिखरे सर करणारा ठरेल. 11 एप्रिलपासून या तिकडीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवेल.
advertisement
4/7
वृषभ - आर्थिक लाभ आणि पदोन्नती: वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक सुबत्तेचा असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि प्रमोशनचे प्रबळ योग आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळेल.
advertisement
5/7
मिथुन - व्यवसायात वाढ आणि नवीन संधी: मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने या युतीचा तुम्हाला मोठा फायदा होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तुमच्या बोलण्याने आणि चातुर्याने तुम्ही मोठी कामे सहज पूर्ण कराल. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल.
advertisement
6/7
वृश्चिक - भाग्याची भक्कम साथ: वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा त्रिग्रही योग नशिबाची कवाडे उघडणारा ठरेल. तुमच्या धाडसी निर्णयामुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. रखडलेली सरकारी कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
धनु - मालमत्ता आणि सुख-सुविधा: धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ भौतिक सुखसोयींमध्ये वाढ करणारा असेल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न या 21 दिवसांत पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक विवंचना दूर होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
11 एप्रिलपासून चमकणार नशीब! त्रिग्रही योग 'या' 4 राशींना करणार मालामाल, होणार डबल प्रॉफिट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल