एफडीवरील व्याजदर बँकेनुसार मोठ्या प्रमाणात बदलतात. स्मॉल फायनान्स बँका जास्त व्याज देत असताना, प्रायव्हेट आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका तुलनेने कमी परतावा देत आहेत. व्याजदरातील थोडासा फरकही विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीत एकूण उत्पन्नावर मोठा परिणाम करू शकतो.
1 एप्रिलपर्यंत विविध बँकांचे एफडी व्याजदर पुढीलप्रमाणे
स्मॉल फायनान्स बँका
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक – 1 ते 5 वर्षांसाठी 8.10% पर्यंत व्याज
advertisement
जन स्मॉल फायनान्स बँक – 8% पर्यंत व्याज
ESAF स्मॉल फायनान्स बँक – 8% पर्यंत व्याज
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक – 7.80% पर्यंत व्याज
स्लाइस स्मॉल फायनान्स बँक – 7.75% पर्यंत व्याज
प्रायव्हेट बँका
आयडीएफसी फर्स्ट बँक – 7.40% पर्यंत व्याज
एसबीएम बँक इंडिया – 7.30% पर्यंत व्याज
बंधन बँक – 7.25% पर्यंत व्याज
RBL बँक – 7.20% पर्यंत व्याज
DCB बँक – 7.15% पर्यंत व्याज
सरकारी बँका
पंजाब आणि सिंध बँक – 6.75% पर्यंत व्याज
बँक ऑफ महाराष्ट्र – 6.65% पर्यंत व्याज
बँक ऑफ इंडिया – 6.60% पर्यंत व्याज
पंजाब नॅशनल बँक – 6.60% पर्यंत व्याज
स्टेट बँक ऑफ इंडिया – 6.45% पर्यंत व्याज
विदेशी बँका
ड्यूश बँक – 7% पर्यंत व्याज
स्टँडर्ड चार्टर्ड बँक – 6.60% पर्यंत व्याज
एचएसबीसी बँक – 5.50% पर्यंत व्याज
जास्त परतावा मिळवण्यासाठी स्मॉल फायनान्स बँका आकर्षक पर्याय ठरत असल्या तरी गुंतवणूक करताना सुरक्षितता, बँकेची विश्वासार्हता आणि कालावधी यांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे.
