लखनऊ-हैदराबाद सामन्यात वाद
रविवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर ऋषभ पंतने जयदेव उनाडकटच्या बॉलिंगवर फोर मारली, पण डगआऊटमध्ये असलेल्या आवेश खानने बॉल बाऊंड्री लाईनला स्पर्श करण्याआधीच बॅटने उडवला. बॉलने बाऊंड्री लाईनला स्पर्श केलेला नसतानाही अंपायरनी फोर दिली त्यामुळे लखनऊचा विजय झाला.
सोशल मीडियावर मात्र आवेश खानचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. आवेशच्या या कृतीबद्दल लखनऊला 5 रनची पेनल्टी दिली पाहिजे, अशी मागणीही झाली. आवेश खानने बॉल बाऊंड्री लाईनला स्पर्श होण्याआधीच मैदानात फेकला, त्यामुळे आयसीसीचा नियम 20.1 (डेड बॉल) आणि नियम 41 (अनफेयर प्ले) याची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणीही चाहत्यांकडून केली गेली.
advertisement
आवेश खानकडून ही चूक झाल्याचं मान्य केलं गेलं तरी ऋषभ पंतने शॉट मारला तेव्हा बाऊंड्री लाईनवर कोणताही फिल्डर नव्हता. आवेशने फिल्डरला फोर अडवण्यापासून रोखलं नाही, त्यामुळे अनफेयर प्ले चा नियम इथे लागू होणार नाही, असा दावाही एका अंपायरने केला आहे.
पहिल्या दोन सामन्यातही वाद
फक्त आवेश खानच नाही तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये अंपायरने दिलेल्या निर्णयावर हैदराबादची टीम नाराज असून ते बीसीसीआयकडे याबाबत तक्रार करण्याची शक्यता आहे. आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात हेनरिक क्लासेनचा कॅच फिल सॉल्टने बाऊंड्री लाईनवर पकडला, पण सॉल्टचा पाय बाऊंड्री लाईनला लागल्याचं अनेकांना वाटत होतं, तरीही अंपायरने क्लासेनला आऊट दिलं.
केकेआरविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वरुण चक्रवर्तीने बाऊंड्री लाईनवरच वरुण चक्रवर्तीचा कॅच पकडला, पण थर्ड अंपायरने एका एँगलने पाहिल्यानंतर वरुणचे हात बॉलच्या खाली असल्याचं दिसत होतं, तर दुसऱ्या एँगलने कॅच पकडण्याआधी बॉलने मैदानाला स्पर्श केल्याचं वाटत होतं, तरीही अभिषेकला आऊट दिलं गेलं.
केकेआरविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्सचा विजय झाला असला तरी आरसीबी आणि लखनऊविरुद्धचे सामने त्यांनी गमावले. तीन सामन्यांमधल्या या तीन वादग्रस्त निर्णयांबाबत हैदराबाद बीसीसीआयकडे तक्रार करणार आहे, आतापर्यंत ही तक्रार नोंदवलीही गेली असेल, असं हैदराबाद टीमच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
