शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणूक ते अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं.
"उमेदवार देणं हा त्या पक्षाचा विषय आहे. काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यावर फार चर्चा करण्याची गरज नाही. बिनविरोध करा अस म्हणायचं पण काही कारण नाही. लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मागच्या निवडणुकीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा अशी झाली होती, तेंव्हा सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. सुप्रिया यांची चौथी निवडणूक होतीकाँग्रेसला बोलण्याची काय गरज आहे, राजकारणात येणारी लोक लोकांची काम करण्यासाठी येतात, अजित पवार लोकांची काम करत होते. त्यांचा आदर आहे, हे मान्य केलं आहे ते जाण्याचं दुःख कुटुंब म्हणून आम्हाला सगळ्यांना आहे. कुटुंबात एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख त्याची बाकीची भूमिका मांडली जाते, ती राजकीय नसते. आज ती जबाबदारी माझी होती. त्यामुळे आम्ही ठरवलं आपल्याकडून उमेदवारी द्यायची नाही. आता समोर कुणीतरी लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत उभं राहावं लागतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
advertisement
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल पक्ष हायजॅक करत होते?
"त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निष्कर्ष काढला हे त्यांनी पाहिलं पाहिजे. त्यांनी आमच्या पक्षामध्ये विलनीकरणांची चर्चा झाली नाही. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली होती. अजित पवारांबद्दल सर्वांना आदर होता. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल त्यांच्या सहकारी काय निर्णय घेतात, कुणावर विश्वास ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे, असं म्हणत शरद पवारांनी पुढे बोलण्याचं टाळलं
प्राथमिकदृष्या अजितदादांचा अपघात
त्यांनी अभ्यास केला त्याच्यामुळे आणखी काही असेल तर त्याबद्दल माझ्याकडे आणखी माहिती नाही. ज्या दिवशी अपघाात घडला, त्यावेळी अजित पवार हे सकाळी ८ वाजता येणार होते. विमानतळाच्या धावपट्टीच्या बाजूला विमान घसरलं. मी त्या दिवशी मुंबईतून बारामतीत आलो तासाभरात त्याच बारामती विमानतळावर आलो होतो. हा अपघात असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. रोहित पवार यांनी या घटनेचा काही अभ्यास केला आहे, त्याबद्दल माझ्याकडे इतकी माहिती नाही. पण ते सरकारमध्येच आहे. त्याबद्दल त्यांना विचारलं पाहिजे.
खरात प्रकरणात लोकप्रतिनिधींची नावं चिंताजनक
"मी 2-3 ठिकाणी जातो. पंढरपूरला पांडुरंग, तुळजापूरला तुळजाभवानीचं दर्शन घेतो. निवडणुकीवेळी कान्हेरी गावात मारुतीच दर्शन घेतो पण त्याची जाहिरात करत नाही. आज राज्यात चिंता वाटावी अशी परिस्थिती आहे. खरात बाबानंतर आणखी बाबा आला आहे. राज्यात बाबांची गर्दी झाली आहे. एका बाजूला शाहू, फुले, आंबेडकर म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी जातात हे चिंताजनक आहेत. कोणी किती फोन केले हे माझ्या वाचनात आलं, त्यात अनेकांची नावं आहेत. त्यात राजकीय पक्षात स्थान भुषवणारे लोक आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी राजकीय नेत्यांच्या सहभागावर आश्चर्य व्यक्त केलं.
अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी
"रोहित पवार यांनी अभ्यास केला होता म्हणून ते बोलत आहेत. माझ्याकडे अधिकृत माहिती नाहीये .8.30 - 9 वाजता अजित पवार यांचं विमान रनवे पासून बाजूला जाऊन अपघात झाला. त्यानंतर मी हेलिकॉप्टर ने गेलो आणि लँड झालो. हा अपघात असावा अस माझं प्राथमिक मत आहे. पण रोहित यांनी आरोप करताना काही अभ्यास केला आहे म्हणून ते बोलत आहेत .CBI चौकशी करण्याची रोहित पवार मागणी करत आहेत, त्याबाबत सरकारला विचारावा लागेल, असंही पवार स्पष्टपणे बोलले.
इराण-इस्त्रायल युद्धाचा भारतावर परिणाम होणार
"याचा भारतावर परिणाम होणार आहे. अनेक वस्तूंची निर्यात थांबली आहे. इस्रायलससोबत आपले संबंध चांगले होते. इस्रायलमध्ये देशाचा पाहिला मंत्री गेला त्याच नाव शरद पवार. मला तुमच्या शिष्टमंडळामध्ये यायचं अस तेव्हाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होती, ते यायचे असं म्हणाले होते. आम्ही तिथे शेती आणि पशुसंवर्धनाचं काम पाहिलं आणि त्याची माहिती घेतली. आमचं शिष्टमंडळ परत निघाल तेव्हा मोदींनी मला इच्छा व्यक्त केली की, पंतप्रधान यांना भेटायचं आहे.
