TRENDING:

Skin Care : डाळिंबाची साल म्हणजे गुणकारी औषध, साल फेकू नका, वाचा साल वापरण्याचे बहुविध फायदे

Last Updated:

आयुर्वेदात डाळिंबाला संपूर्ण औषध मानलं जातं. शरीराला बळकटी देण्याबरोबरच, पचनक्रियेपासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत विविध प्रकारच्या त्रासांवरही उपचार म्हणून या सालाचा उपयोग करता येतो. डाळिंबाच्या सालीमधे औषधी गुणधर्म आढळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : डाळिंबाचे लाल चुटूक दाणे चवीला मस्त लागतात. डाळिंब खाल्ल्यानंतर साल निरुपयोगी आहे असं समजून फेकून देत असाल तर आधी ही माहिती वाचा.
News18
News18
advertisement

डाळिंबाचं साल अनेक आजारांवर औषध ठरू शकते. आयुर्वेदात डाळिंबाला संपूर्ण औषध मानलं जातं. शरीराला बळकटी देण्याबरोबरच, पचनक्रियेपासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत विविध प्रकारच्या त्रासांवरही उपचार म्हणून या सालाचा उपयोग करता येतो. डाळिंबाच्या सालीमधे औषधी गुणधर्म आढळतात.

डाळिंब आणि त्याच्या सालीबद्दल आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे ते समजून घेऊया. आयुर्वेदात, डाळिंबाला वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारं फळ मानलं जातं. यामुळे रक्ताभिसरण वाढतं, अशक्तपणा दूर होतो आणि पचनशक्ती मजबूत होते. डाळिंबाच्या सालीमधे जीवाणूनाशक, अँटीऑक्सिडंट आणि दाहशामक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्याचा नैसर्गिक औषध म्हणून उपयोग होतो.

advertisement

Summer Care : उन्हाळ्यातही वाटेल थंडगार, शहाळ्याची मलई आणि केळं वापरुन बनवा फ्रेश स्मूदी, पाहा कृती

डाळिंबाची साल अतिसारावर रामबाण उपाय - उन्हाळ्यात अनेकांना अतिसार ही समस्या जाणवते. डाळिंबाची साल खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे पोटातील हानिकारक जीवाणू नष्ट करायला मदत होते, आतड्यांची सूज कमी करायला मदत होते आणि अतिसारावर लवकर नियंत्रण मिळवणं शक्य होतं.

advertisement

वापरण्याची पद्धत समजून घेऊया. साल वाळवून त्याची पूड बनवा. ती ताकात मिसळा आणि त्यात थोडं जिरं घाला. दिवसातून एक-दोन वेळा पिऊ शकता.

बद्धकोष्ठतेपासून आराम - बद्धकोष्ठता ही समस्या मुळात चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे जाणवते. डाळिंबाच्या सालीमुळे पचनसंस्था सुधारते, यामुळे शौचास साफ होण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. सालीची पावडर ताकासोबत घेतल्यानं बद्धकोष्ठता आणि मूळव्याध या दोन्हींपासून आराम मिळतो.

advertisement

त्वचेसाठी नैसर्गिक सौंदर्य उपचार - मुरुम आणि डाग असतील, तर डाळिंबाची साल हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. यामुळे जीवाणू नष्ट होतात, मुरुम आणि पुटकुळ्या कमी होतात आणि त्वचा नितळ आणि चमकदार होते. फेस पॅक बनवण्यासाठी, सालीची पावडर घ्या. त्यात गुलाबजल मिसळा आणि पेस्ट बनवा. आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा.

Summer Care : उन्हाळ्यासाठी ठंडा फंडा, पुदिना ठेवेल डोकं शांत, उन्हाळ्यातली डोकेदुखी होईल कमी

advertisement

मुलांसाठी फायदेशीर - मुलांमधे आतड्यांतील जंत ही एक सामान्य समस्या आहे. दररोज डाळिंबाचे दाणे खाऊ घालणं खूप फायदेशीर आहे. यामुळे आतड्यांतील जंत नाहीसे होतात, पोटदुखीपासून आराम मिळतो आणि ॲनिमियातून बाहेर पडायला मदत होते.

रक्त वाढण्यासाठी आणि शक्ती देण्यासाठी डाळिंबाची मदत होऊ शकते. डाळिंबाला रक्तवर्धक म्हणूनही ओळखलं जातं. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं आणि अशक्तपणा दूर करायला मदत होते.

या मुद्द्यांकडे विशेष लक्ष द्या:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

डाळिंबाच्या रसाऐवजी त्याचे दाणे खा. या दाण्यांमधे फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनासाठी चांगलं असतं. डाळिंबाची साल वापरताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डाळिंबाच्या साली जास्त प्रमाणात खाल्ल्यनं पोटात जळजळ होऊ शकते. कोणताही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय डाळिंबाच्या सालीचा वापर करु नका.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : डाळिंबाची साल म्हणजे गुणकारी औषध, साल फेकू नका, वाचा साल वापरण्याचे बहुविध फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल