TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावरचं संकट आता टळणार, जाता जाता 2 जिल्हे भिजणार; हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये विजांसह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या दोन जिल्ह्यांव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रावरचं संकट आता टळणार, जाता जाता 2 जिल्हे भिजणार; हवामान खात्याचा अलर्ट
राज्यात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. अशातच हवामान विभागाने 7 एप्रिल रोजी विदर्भातील 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये विजांसह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या दोन जिल्ह्यांव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
advertisement
2/7
कोकण भागामध्ये 7 एप्रिल उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवेल. या भागात किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 32 ते 35 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये दिवसभर कोरडे हवामान राहील. येथे किमान तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर कमाल तापमान 34 ते 38 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि नांदेड या भागांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. किमान तापमान 22 ते 25 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 36 ते 40 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमान वाढ पाहायला मिळेल. नाशिकमध्ये किमान तापमान 21 ते 24 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 33 ते 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागपूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या भागांमध्ये किमान तापमान 24 ते 27 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 38 ते 42 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
7/7
दरम्यान, चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये हवामानात काहीसा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर येथे विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग वाढणे आणि हलका पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावरचं संकट आता टळणार, जाता जाता 2 जिल्हे भिजणार; हवामान खात्याचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल