TRENDING:

Ashok Kharat : झटपट देवदर्शनासाठी कागदपत्र देताय? मुंबईच्या व्यावसायिकाला खरातनं असा लावला २ कोटींचा 'चुना'! पोलीसही चक्रावले

Last Updated:

Ashok Kharat : पूजाविधी आणि देवदर्शनाच्या नावाखाली भक्तांना गंडा घालणाऱ्या खरातने आता एका बड्या हॉटेल व्यावसायिकाच्या नावावर मोठा घोटाळा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिष अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे धागेदोरे आता नाशिकच्या सीमा ओलांडून थेट मुंबई आणि शिर्डीपर्यंत पोहोचले आहेत. पूजाविधी आणि देवदर्शनाच्या नावाखाली भक्तांना गंडा घालणाऱ्या खरातने आता एका बड्या हॉटेल व्यावसायिकाच्या नावावर मोठा घोटाळा केला आहे.
झटपट देवदर्शनासाठी कागदपत्र देताय? मुंबईच्या व्यावसायिकाला खरातनं असा लावला २ कोटींचा 'चुना'! पोलीसही चक्रावले
झटपट देवदर्शनासाठी कागदपत्र देताय? मुंबईच्या व्यावसायिकाला खरातनं असा लावला २ कोटींचा 'चुना'! पोलीसही चक्रावले
advertisement

बनावट खाते उघडून तब्बल २ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांनी खरातसह पतसंस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला असून, तपासाची चक्रे आता शिर्डीच्या दिशेने फिरू लागली आहेत.

असा उघड झाला २ कोटींचा 'बनावट' खेळ

मुंबईतील हॉटेल व्यावसायिक दिनेश परब यांची १४ वर्षांपूर्वी खरातशी ओळख झाली होती. परब यांना शिर्डी देवदर्शनाचे व्हीआयपी बुकिंग करून देतो, असे आमिष दाखवून खरातने त्यांचे व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो मिळवले. या कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने 'समता नागरी सहकारी पतसंस्थेत' परब यांच्या नावे बनावट खाते उघडले असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement

खरातनं कसा केला घोटाळा?

खात्यावर परब यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. धक्कादायक म्हणजे, या खात्यावर खरातने स्वतःचे नाव 'वारसदार' म्हणून लावले. व्यवहारांचे मेसेज परब यांना जाऊ नयेत, म्हणून खरातने स्वतःचा मोबाईल क्रमांक बँकेला दिला.

खातेदार प्रत्यक्ष हजर नसताना आणि कोणतीही पडताळणी न करता कोट्यवधींचे व्यवहार होऊ दिले गेले. त्यामुळे यात तत्कालीन मॅनेजरची भूमिका संशयास्पद आहे. जेव्हा पोलिसांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी नोटिसा बजावल्या, तेव्हा आपल्याला कळत नकळत आपल्या नावे २ कोटींची उलाढाल झाल्याचे पाहून परब यांना धक्का बसला आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला.

advertisement

नाशिकनंतर आता 'शिर्डी' तपासाचे केंद्र

संशयित अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आधीच ११ गुन्हे दाखल आहेत, ज्यातील ८ गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे आहेत. मात्र, आता राहाता पोलीस ठाण्यात दाखल झालेला फसवणुकीचा हा १३ वा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

सध्या विशेष तपास पथकाने (SIT) महाराष्ट्र पोलीस अकादमीत मुक्काम ठोकला असून, खरातच्या आर्थिक साम्राज्याची आणि सावकारीच्या जाळ्याची कसून चौकशी सुरू केली आहे. शिर्डी पोलिसांनी यापूर्वीच सावकारी प्रकरणात काही संशयितांना अटक केल्याने आता या प्रकरणाचे मुख्य केंद्र शिर्डी ठरत आहे. या गुंतागुंतीच्या तपासामुळे खरातच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : झटपट देवदर्शनासाठी कागदपत्र देताय? मुंबईच्या व्यावसायिकाला खरातनं असा लावला २ कोटींचा 'चुना'! पोलीसही चक्रावले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल