Marathi Actresses Second Marriage : लग्न, डिवोर्स, लग्न! 4 महिन्यात 3 मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटला संसार, एकीचं 8 वर्षांनी बदललं आयुष्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actresses Second Marriage : मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत तीन मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यामधील एका अभिनेत्रीने तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/7

अभिनेत्री शुभांगी सदावर्तेपासून हिच्यापासून सुरूवात करू. शुभांगीचं पहिलं लग्न संगीतकार आनंद ओक यांच्याशी झालं होतं. 2020 मध्ये दोघांनी लग्न केलं. पाच वर्षांच्या संसारानंतर सप्टेंबर 2025 मध्ये आनंद ओक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली होती.
advertisement
2/7
त्यानंतर काही महिन्यांतच 5 डिसेंबर 2025 रोजी शुभांगीने सुमीत म्हसाळेकर याच्याबरोबर दुसरं लग्न केलं. सुमीत हा मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आहे.
advertisement
3/7
यानंतर दुसरं चर्चेत आलेलं नाव म्हणजे 'शेवंता' म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने 13 फेब्रुवारी 2026 रोजी तनुज गोवळकरसोबत दुसरं लग्न केलं.
advertisement
4/7
अपूर्वाने पहिल्या घटस्फोटानंतर तब्बल आठ वर्षांनी पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं.
advertisement
5/7
या यादीतील तिसरं नाव आहे 'एलिझाबेथ एकादशी' फेम अभिनेत्री नंदिता पाटकर. नंदिताने 6 एप्रिल 2026 रोजी विपुल महागावकरसोबत लग्न केलं. विपुल महागावकर हा मराठी रंगभूमीवरील एक तरुण, अभ्यासू आणि गुणी दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.
advertisement
6/7
'पै पैशाची गोष्ट' आणि 'उध्वस्त धर्मशाळा' यांसारख्या नाटकांमधून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो थिएटर डायरेक्टर, डॉक्युमेंट्री फिल्ममेकर आणि थिएटर क्युरेटर म्हणूनही काम करतो.
advertisement
7/7
या तिन्ही अभिनेत्रींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या चढ-उतारांनंतरही या नव्याने उभं राहत आनंदाचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actresses Second Marriage : लग्न, डिवोर्स, लग्न! 4 महिन्यात 3 मराठी अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा थाटला संसार, एकीचं 8 वर्षांनी बदललं आयुष्य