LPG Cylinderवर किती टॅक्स लागतो? GST हटवल्यावर किती स्वस्त मिळेल? एकदा पाहाच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
LPG Cylinder Booking Tax : सध्या देशभरात एलपीजी गॅस सिलेंडर चर्चेत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजीटी टंचाई निर्माण होणार अशा चर्चा सुरू असल्याने एलपीजी गॅस सध्या चिंतेचा विषय बनलाय.
advertisement
1/7

नवी दिल्ली : अमेरिका-इराण युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झालाय. याच कारणामुळे सरकारने काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली होती.
advertisement
2/7
आता चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनचीला टॅक्स-फ्री करण्याची मागणी केली आहे. सीटीआयने म्हटलंय की, टॅक्स हटवल्याने गॅस स्वस्त होईल आणि सामान्य व्यक्तीला दिलासा मिळेल. अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की, अखेर एलपीजी आणि पीएनजीवर किती टॅक्स लागतो आणि टॅक्स हटवल्यावर गॅसच्या किंमती किती कमी होतील?
advertisement
3/7
एलपीजीवर जीएसटी लागू आहे. मात्र पीएनजीवर लागू नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरवर सध्या 5% जीएसटी लावला जातो. तसंच हॉटेल, रेस्टॉरेंट आणि ढाब्यांसारख्या व्यवसायात वापर होणाऱ्या कमर्शियल सिलेंडरवर 18 टक्के जीएसची वसूल केला जातो.
advertisement
4/7
पाइप्ड नॅच्युरल गॅसवर सध्या जीएसटी लागू नाही. ज्यामुळे राज्य सरकार यावर व्हॅट वसुल करते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे दर 3% ते 14.5% पर्यंत आहे. उदाहरण पाहायचे झाल्यास, दिल्लीत पीएनजीवर सध्या 5% व्हॅट लागू आहे. CTI ची मागणी आहे की, या व्हॅटला पूर्णपणे संपवलं पाहिजे. जेणेकरुन पाइपमधून येणारा गॅस सामान्य जनतेसाठी स्वस्त होऊ शकेल.
advertisement
5/7
टॅक्स हटवल्याने किती फायदा होईल? : सरकारने एलपीजीवर जीएसटी बंद केला तर याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 913 रुपयांना मिळतो. 5% जीएसटी हटवल्याने तो जवळपास 43 रुपयांनी स्वस्त होऊन 869.52 रुपयांचा होईल. अशाप्रकारे कमर्शियल सिलेंडर 18% जीएसटीसह दिल्लीमध्ये 2078.50 रुपयांचा आहे. टॅक्स फ्री झाल्यानंतर तो जवळपास 317 रुपये स्वस्त होईल आणि याची किंमत 1761.44 रुपये होईल.
advertisement
6/7
सरकारने लोकांना दिलासा द्यावा: चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री(CTI) चे चेयरमन बृजेश गोयल म्हणतात की, टॅक्स हटवून सरकार सामान्य जनतेला दिलासा द्यायला हवा. सीटीआयचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट दीपक गर्ग आणि व्हाइस प्रेसिडेंट राहुल गांधींनी म्हटले की, पश्चिम आशियामध्ये वाढते संकट आणि संघर्षाने जागतिक तेल आणि गॅस संकटाला जन्म दिलाय.
advertisement
7/7
संपूर्ण देशात एलपीजी आणि पीएनजीची मागणी वाढलेली दिसतेय. जनरल सेक्रेटरी गुरमीत अरोडा आणि रमेश आहुजा यांच्यानुसार, दिल्लीत फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्लीत रोज सरासरी 686 नवीन पीएनजी कनेक्शन जोडले जात आहेत. जे मार्चपर्यंत जवळपास तीन पटींनी वाढून जवळपास 2,000 कनेक्शन प्रतिदिवस झालेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LPG Cylinderवर किती टॅक्स लागतो? GST हटवल्यावर किती स्वस्त मिळेल? एकदा पाहाच