TRENDING:

शेतकऱ्यांना मोठा धक्का! प्रसिद्ध ट्रॅक्टर कंपनीने दरवाढीचा घेतला निर्णय, कधीपासून होणार लागू?

Last Updated:

Tractor News : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने आपल्या ट्रॅक्टरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्स कुबोटाने आपल्या ट्रॅक्टरच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर १५ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत. विशेष म्हणजे, ही दरवाढ कुबोटा ब्रँडचे ट्रॅक्टर वगळता इतर सर्व मॉडेल्ससाठी लागू असणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की किमती मॉडेल, व्हेरिएंट आणि बाजारपेठेनुसार बदलतील, त्यामुळे सर्व ट्रॅक्टरसाठी एकसमान दरवाढ होणार नाही.
Tractor News
Tractor News
advertisement

निर्णय का घेतला?

कंपनीच्या मते, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि परिचालन खर्चातील वाढ ही दरवाढीमागची प्रमुख कारणे आहेत. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वाहन आणि कृषी उपकरण उत्पादकांकडून दरवाढीचे निर्णय घेतले जात आहेत, त्याच पार्श्वभूमीवर एस्कॉर्ट्स कुबोटानेही हा निर्णय घेतला आहे.

विक्रीत मोठी वाढ

दरम्यान, दरवाढीच्या पार्श्वभूमीवरही कंपनीच्या विक्रीत सकारात्मक चित्र दिसून आले आहे. मार्च २०२६ मध्ये कंपनीने एकूण १२,११९ ट्रॅक्टरची विक्री केली, जी मागील वर्षीच्या ११,३७४ युनिट्सच्या तुलनेत ६.६ टक्क्यांनी अधिक आहे. देशांतर्गत बाजारात कंपनीची कामगिरी अधिक मजबूत राहिली असून ११,५८२ युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी जास्त आहे. यावरून ग्रामीण भागात ट्रॅक्टरची मागणी अजूनही स्थिर आणि मजबूत असल्याचे स्पष्ट होते.

advertisement

ट्रॅक्टरची वाढती मागणी

ग्रामीण भागातील वाढती मागणी आणि रब्बी पिकांच्या कापणीचा हंगाम यामुळे ट्रॅक्टर विक्रीत वाढ झाली आहे. काही भागात पावसामुळे कापणीला विलंब झाला असला तरी पिकांची स्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांची यंत्रसामग्रीवरील गुंतवणूक वाढत आहे. यासोबतच देशातील जलाशयांमधील पाण्याची पातळी सुधारल्यामुळे सिंचन व्यवस्था मजबूत झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून ट्रॅक्टर खरेदीला चालना मिळाली आहे.

advertisement

मात्र, निर्यातीच्या बाबतीत कंपनीला काही प्रमाणात घसरणीचा सामना करावा लागला आहे. मार्च २०२६ मध्ये कंपनीने ५३७ ट्रॅक्टर निर्यात केले, जे मागील वर्षीच्या ५९९ युनिट्सपेक्षा कमी आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि परिस्थितीमुळे ही घट झाल्याचे मानले जात आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धाचा परिणाम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

पुढील काळातही काही आव्हाने कायम राहू शकतात, असे संकेत कंपनीने दिले आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धाच्या तणावामुळे खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होऊ शकतो. यामुळे शेतीसंबंधित गुंतवणूक आणि ट्रॅक्टरची मागणीही प्रभावित होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांना मोठा धक्का! प्रसिद्ध ट्रॅक्टर कंपनीने दरवाढीचा घेतला निर्णय, कधीपासून होणार लागू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल