TRENDING:

Cheque भरताना करु नका या सामान्य 8 चुका! बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं

Last Updated:
common cheque mistakes : चेकचा वापर देवाण-घेवाणीसाठी करणं ही सामान्य गोष्ट आहे. विशेषतः मोठी रक्कम देण्यासाठी चेकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र चेक भरताना लोक कोणत्या सामान्य चुका करतात तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/10
Cheque भरताना करु नका या सामान्य 8 चुका! बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं
नवी दिल्ली : चेकबुकचा वापर बँकिंग फॅसिलिटी यूज करणारे जास्तीत जास्त लोक करतात. चेकच्या माध्यमातून आपल्या देशात खूप देवाण-घेवाण होते. एखादी मोठी रक्कम भरायची असेल तर चेकचाच वापर केला जातो. तुम्हीही नेहमी चेकचा वापर करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा तुम्ही अडचणीत सापडू शकता. यामुळे तुमचं बँक अकाउंटही रिकामं होऊ शकतं.
advertisement
2/10
आपण ज्या व्यक्तीचं नाव चेकमध्ये भरुन देतो. त्या व्यक्तीला बँक चेकवर लिहिलेली रक्कम देते. ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत, चेकमध्ये तिचं नाव लिहावं लागतं. व्यक्तीसोबतच एखादी कंपनी किंवा संस्थेच्या नावानेही चेक जारी केला जाऊ शकतो. चेक भरताच काही लोक नेहमीच चुका करतात. याच चुकांविषयी आपण जाणून घेऊया.
advertisement
3/10
अमाउंटनंतर Only न लिहिण्याची चूक अनेक लोक करतात. पण ही चूक महागात पडू शकते. कारण समोरचा व्यक्ती त्या रकमेसमोर आणखी आकडे टाकून रक्कम वाढवून घेऊ शकतो. यामुळे रक्कम लिहिल्यानंतर Only अवश्य लिहाल. तसंच समजा 50000 रक्कम असेल तर त्यासमोर 50000/ ही आडवी रेष अवश्य टाका. ज्यामुळे तुमची फसवणूक टळेल.
advertisement
4/10
अनेक लोक विश्वास करुन चेकवर साइन करुन समोरच्याला देतात. पण अशी चूक तुम्ही करु नका. चेकवर साइन करण्यापूर्वी नेहमी ज्याला चेक देत आहात त्याचं नाव, अमाउंट आणि डेट त्यावर अवश्य लिहा.
advertisement
5/10
चुकीची स्वाक्षरी केल्याने बँकांमध्ये सर्वाधिक चेक बाउंस होतात. कारण स्वाक्षरी ही बँकेतील स्वाक्षरीसोबत मॅच झाली नाही तर चेक बाउंस होईल. यामुळे बँकेच्या फॉर्मवर तुम्ही जशी स्वाक्षरी केली होती. तशीच स्वाक्षरी ही चेकवर करा.
advertisement
6/10
चुकीची तारीख लिहिलेली असेल तरीही बँक चेक स्वीकार करत नाही. यामुळे चेकमध्ये तारीख ही योग्य लिहा जेणेकरुन पैसे काढण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
advertisement
7/10
चेक भरताना पेनच्या शाईची क्वालिटीही अवश्य चेक करा. अनेक लोक असा पेन वापरतात ज्याची शाई फिकी होते. मग समोरचा सहज ती शाई मिटवून दुसरं काही लिहू शकतो. चेकसोबत कोणतीही छेडछाड टाळायची असेल तर यामध्ये परमानेंट इंकचा प्रयोग करा. जेणेकरुन यात कोणताही बदल करता येणार नाही.
advertisement
8/10
बॅलेन्स नसताना चेक साइन करणं टाळा. कारण चेक बाउंस झाल्यावर तुम्हाला दंडासोबतच तुरुंगातही जावं लागू शकतं. ज्यावेळी एखादी बँक एखाद्या कारणामुळे चेक रिजेक्ट करते आणि पेमेंट होऊ शकत नाही तर याला चेक बाउंस होणं असं म्हणतात. असं होण्याचं जास्तीत जास्त कारण हे अकाउंटमध्ये बॅलेन्स नसणं असतं. चेक जारी करताना तुमच्या अकाउंटमध्ये परिपूर्ण बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे.
advertisement
9/10
चेक पोस्ट-डेटिंग करणं टाळा, कारण कदाचित बँक हे स्वीकार करणार नाही. बँकेला चेक पेमेंट करण्यात तारीख महत्वपूर्ण भूमिका निभावते. ज्यावेळी तुमच्या अकाउंटमधून पैसे कट व्हाव असं तुम्हाला वाटत असेल तिच तारीख चेकवर टाका. तुम्ही चुकीची तारीख, महिना किंवा वर्ष टाकलं तर तुमचा चेक परत येऊ शकतो.
advertisement
10/10
चेक नंबर लक्षात ठेवा आणि ते आपल्या रेकॉर्डमध्ये नोट करा. हे सुनिश्चित करणं महत्त्वपूर्ण आहे की, तुम्ही तो नंबर सुरक्षित स्थानावर लिहून ठेवा. ज्यावेळी काही विवाद होईल, तर तुम्ही शंका दूर करण्यासाठी किंवा पडताळणीसाठी तुम्ही बँकेला देण्यासाठी या चेक नंबरचा वापर करु शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Cheque भरताना करु नका या सामान्य 8 चुका! बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल