Gold Silver Price: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, 22 आणि 24 कॅरेटचे दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्याच्या किमतीतील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे डॉलरचे सातत्याने मजबूत होणे. युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता कायम आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींनी परिस्थिती आणखीनच बिकट केली आहे.
advertisement
1/6

सोन्याचे दर</a> सराफ मार्केटमध्ये वाढलेले होते. आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत तोळ्यामागे 1 लाख 51 हजार रुपये प्रति ग्रॅम झाली आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 50 हजार ९२० रुपये प्रति तोळा आहे. " width="1600" height="900" /> सलग तीन दिवस सुट्ट्या झाल्या आणि त्यानंतर आज मार्केट उघडलं, विकेण्डला सोन्याचे दर सराफ मार्केटमध्ये वाढलेले होते. आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत तोळ्यामागे 1 लाख 51 हजार रुपये प्रति ग्रॅम झाली आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 50 हजार ९२० रुपये प्रति तोळा आहे.
advertisement
2/6
मागच्या आठवड्याभरात सोन्याचे दर २८६० रुपयांनी महाग झालं. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 2600 रुपयांनी महाग झालं आहे. शुक्रवारी सोन्या चांदीच्या किंमतीमध्ये विशेष बदल झाल्याचं पाहायला मिळालं नाही. आज मात्र पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किंमती घसरल्या आहेत.
advertisement
3/6
सोन्याचे दर ऑल टाइम हायपासून 33 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत. तर चांदीच्या दरातही 2 लाख रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. डॉलर मजबूत होत असल्यामुळे सोनं चांदी MCX वर घसरत आहे. दर घसरल्यामुळे ग्राहकांची पुन्हा खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. यापेक्षा जास्त खाली दर येण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
4/6
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 4591.52 डॉलर प्रति औंसवर आहेत. जिओ पॉलिटिक्स, अमेरिका इराण युद्धाचा परिणाम आणि मजबूत होत असलेला डॉलर यामुळे सोन्या चांदीच्या मार्केटमध्ये सध्या पडझड सुरू आहे. एकेकाळी स्थिर आणि चांगलं नफा देणारं हे मार्केट मानलं जात होतं. मात्र आता दरही अस्थिर होत आहे.
advertisement
5/6
मुंबईत चांदीचे दर 2 लाख 36 हजार ७०६ रुपयांवर पोहोचले आहेत. GST सह हेच दर 2 लाख 38 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं तर चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांची मात्र खरी चांदी झाली आहे.
advertisement
6/6
सोन्याच्या किमतीतील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे डॉलरचे सातत्याने मजबूत होणे. युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता कायम आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींनी परिस्थिती आणखीनच बिकट केली आहे. परिणामी, गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय, नफावसुलीचा सोन्याच्या किमतींवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Price: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, 22 आणि 24 कॅरेटचे दर