TRENDING:

1 जानेवारीपासून सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार? एक्सपर्टने केला खुलासा

Last Updated:
Gold Price 2026: यंदाच्या वर्षी सोन्याने मोठं रिटर्न दिलंय. म्हणूनच आता येत्या वर्षात सोन्याचा दर कसा राहील याविषयी गुंतवणूकदारांना उत्सुकता आहे.
advertisement
1/7
1 जानेवारीपासून सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार? एक्सपर्टने केला खुलासा
नवी दिल्ली : 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत 70% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 1979 नंतरची ही सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे. सोन्याच्या किमतीत ही वाढ जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या गंभीर बदलांचे प्रतिबिंब आहे.
advertisement
2/7
महागाई, घसरणारे व्याजदर आणि जागतिक अनिश्चिततेचा धोका यामुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या धातूंकडे वळत आहेत. त्यांना अशीही आशा आहे की यूएस फेडरल रिझर्व्ह त्यांचे चलनविषयक धोरण आणखी शिथिल करेल. बुधवारी सोन्याने पहिल्यांदाच प्रति औंस 4,500 डॉलर्स ओलांडले. आता प्रश्न असा आहे की 2026 मध्ये सोन्याचा वेग कायम राहील की तो कमी होईल.
advertisement
3/7
सोन्याच्या किमती वाढण्याची ही कारणे देखील आहेत: अमेरिकन डॉलर गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात वेगाने घसरत आहे, ज्यामुळे जगभरात धातूच्या किमती वाढताय. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहेत. खाणकामातील गुंतवणुकीचा अभाव, पुरवठ्यातील अडचणी आणि जकाती यामुळे बाजारपेठ महाग झाली आहे. त्याचप्रमाणे मागणी वाढत आहे. हे सर्व घटक सोन्याच्या वाढीला चालना देत आहेत.
advertisement
4/7
2026 मध्ये सोने वाढेल की घसरेल? : आता प्रश्न असा आहे की 2026 मध्ये सोने वाढत राहील का? सोन्याची किंमत मुख्यत्वे अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांवर अवलंबून आहे. जेव्हा फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करते तेव्हा सोन्याची किंमत वाढते. फेडरल रिझर्व्हने अलीकडेच व्याजदरात कपात केली आहे, ज्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढली आहे.
advertisement
5/7
2026 मध्ये फेडरल रिझर्व्ह देखील व्याजदरात कपात करू शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील याबद्दल बोलले. त्यांनी म्हटले की, बाजार चांगले चालला असेल तर पुढील फेड अध्यक्षांनी व्याजदर कमी करावेत अशी त्यांची इच्छा आहे. बाजारातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षी, म्हणजे 2026 मध्ये दोनदा व्याजदर कमी करू शकते. असे झाले तर सोन्याच्या किमती आणखी वाढतील.
advertisement
6/7
एक्सपर्ट काय सांगतात? : सिटी इंडेक्सचे बाजार विश्लेषक फवाद रझाकजादा यांनी स्पष्ट केले की, सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांनी सांगितले की, सोन्याच्या किमती कमी होण्याचं कोणतंही कारण नाही. म्हणजेच त्या वाढू शकतात.
advertisement
7/7
सोशिएट जनरल येथील विश्लेषकांनी एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली तर त्याचे मुख्य कारण मध्यवर्ती बँकांनी त्यांची खरेदी कमी करणे हे असेल. त्यांनी म्हटले आहे की, असे झाले नाही तर गुंतवणूकदारांच्या भावना सूचित करतात की सोन्याच्या किमती वाढतच राहतील. या विश्लेषकांचा अंदाज आहे की 2026 च्या अखेरीस सोने प्रति औंस $5000 पर्यंत पोहोचू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
1 जानेवारीपासून सोन्याची किंमत कमी होणार की वाढणार? एक्सपर्टने केला खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल