TRENDING:

सोनं 17 टक्क्यांनी झालं स्वस्त! यापुढे वाढणार की पडणार? सुरू होणार खरा गेम

Last Updated:
Gold Price Updates : सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार होत आहेत. सोनं यापुढे आणखी खाली येणार की किंमती वाढणार याविषयी मोठा सस्पेंस आहे. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7
सोनं 17 टक्क्यांनी झालं स्वस्त! यापुढे वाढणार की पडणार? सुरू होणार खरा गेम
मुंबई : जगात युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि ईरानधील युद्धाला आता चार आठवडे पूर्ण झालेय. तरीही युद्ध संपलेलं नाही. ज्यामुळे जगात अस्थिरता निर्माण झालीये. जगात अस्थिरता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. याच कारणामुळे सुरुवातीच्या काळात सोन्याच्या मागणीत तेजी पाहायला मिळाली. पण आता समिकरण पूर्णपणे बदलले आहे आणि आता सोन्याचा भा वाढण्याऐवजी खाली येताना दिसतोय.
advertisement
2/7
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या वक्तव्यांमध्ये संघर्ष विरामाची आशा धूसर केलीये. दोन्ही देशांमध्ये टक्कर देण्याचे संकेत मिळाल्याने बाजारात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. महत्त्वाचं म्हणजे गंभीर तणाव असुनही सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली नाही. म्हणजेच बाजारात अशा काही गोष्टी घडत आहेत, ज्या सोन्याच्या किंमती वाढू देत नाहीये.
advertisement
3/7
सोन्याच्या किंमतीत अपेक्षित तेजी न आल्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, अमेरिकन डॉलर सतत मजबूत होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात. तेव्हा डॉलरच्या व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते. डॉलर मजबुत झाल्यामुळे इतर मुद्रा असणाऱ्यांसाठी सोनं खरेदी करणं हे महाग वाटतं.
advertisement
4/7
डॉलरसोबतच अमेरिकेच्या मजबूत आंतरिक अर्थव्यवस्थेमुळेही सोन्याची चमक थोडी फिकी झाली आहे. अमेरिकेत रोजगाराचे आकडे अपेक्षेपेक्षा खुपच चांगले आहेत आणि तेथील आर्थिक परिस्थिती खुप मजबूत आहे. ज्यावेळी एखाद्या देशातील अर्थव्यवस्था मजबूत होते. तेव्हा तेथील केंद्रीय बँक व्याजदराक कपात करण्यापासून बचाव करते. याच गोष्टी सोन्याच्या विरोधात जातात.
advertisement
5/7
सध्या सोन्याचा बाजार पूर्णपणे ब्रेकिंग न्यूज आणि संवेदनशील आंतरराष्ट्रीय वृत्तांवर टिकला आहे. विशेषज्ञ मानतात की, युद्धाच्या मैदानातून येणारी एखादी बातमी किंवा मोठी आर्थिक धोरणाशी संबंधित बदल हा किंतींमध्ये आग लावू शकतो. सोनं सध्या खुप नाजुक परिस्थितीत आहे. येथे एका गोष्टीमुळे सोन्याचा भाव वरुन खाली आदळू शकतो. अशावेळी खरेदीदारांनी सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडतोय.
advertisement
6/7
6 एप्रिलपासून सुरू होणारा व्यावहारिक आठवडा सोन्याची भविष्यातील दिशा ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. या दरम्यान अमेरिकेच्या नॉन-फार्म पेरोल, एडीपी रोजगार डेटा आणि बेरोजगारी दरसारखे महत्त्वाचे आर्थिक आकडे जारी होणार आहेत. या रिपोर्ट्समध्ये होणारा छोटासा बदलही सोन्याच्या किंमतींना कोणत्याही दिशांना वळवू शकतात.
advertisement
7/7
सोन्यात पैसा लावणाऱ्यांची सध्याची परिस्थिती पाहता, दुर्लक्ष अजिबात व्हायला नको. बाजारात आतल्या आत वादळ येत आहे. जे कोणत्याही वेळी बाहेर येऊन किंमतीत मोठा चढ-उतार आणू शकते. सोन्याच्या किंमती या सध्या 17 टक्क्यंनी खाली आल्या आहेत. पण बाजारातील संवेदनशीलता पाहता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सोनं 17 टक्क्यांनी झालं स्वस्त! यापुढे वाढणार की पडणार? सुरू होणार खरा गेम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल