Gold Rate: सराफा बाजारात मोठ्या घडामोडी, सोनं स्वस्त, तर चांदी महाग, काय आहेत 24 कॅरेटचे भाव?
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार सुरू आहेत. आज नाशिक सराफा बाजारात सोनं स्वस्त झालं असून चांदीच्या दरात मात्र वाढ झालीये.
advertisement
1/5

गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरांत सातत्याने चढ-उतार सुरू हेत. आता भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू असतानाच सराफा बाजारातून मोठी बातमी आहे. सोन्याच्या दरांत पुन्हा घट झाली असून चांदीला मात्र झळाळी आली आहे.
advertisement
2/5
नाशिक सराफा बाजारात आज सोनं स्वस्त झालं आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरांत 200 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर 96 हजार 500 रुपयांवर असणार आहेत. तर 22 कॅरेटसाठी 88 हजार 348 रुपये असणार आहे. तर ग्राहकांना 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं मोडल्यास 93 हजार 605 रुपये मिळतील.
advertisement
3/5
एप्रिलअखेर सोन्याच्या दरांत मोठी वाढ होऊन 1 लाखांचा टप्पा ओलांडला होता. परंतु, त्यानंतर 7 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे दर घसरले होते. सध्याच्या आठवड्यात सोमवारपासून 3 दिवस सोन्याचे दर पुन्हा वाढले होते. गुरुवार आणि शुक्रवारी मात्र यामध्ये 500 रुपयांची घट झालीये.
advertisement
4/5
सोन्यासोबतच चांदीच्या दरांत देखील सतत चढउतार होत आहेत. आज चांदी महागली असून नाशिक सराफा बाजारत 600 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. आज प्रतिकिलो चांदीचा दर 96 हजार 600 रुपयांवर आहे.
advertisement
5/5
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटका सराफा बाजाराला बसत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरांत मोठी वाढ झाली. त्यातच आता भारत-पातिस्तान संघर्ष सुरू असून याचा परिणाम येत्या काळात काय होतो? हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate: सराफा बाजारात मोठ्या घडामोडी, सोनं स्वस्त, तर चांदी महाग, काय आहेत 24 कॅरेटचे भाव?