Indian Railway : ट्रेनचे वेटिंग लिस्ट तिकीटांमध्ये ही असतात वेगवेगळे प्रकार? 'हे' वालं सर्वात आधी होतं कन्फर्म
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ट्रेनचं कोणतं तिकिट सर्वात आधी कन्फर्म होतं आणि आपण कोणतं बुक करावं याबद्दल लोकांना नेहमीच प्रश्न असतो. याचबद्दल आज आम्ही या लेखात सांगणार आहोत.
advertisement
1/5

भारतीय रेल्वेनं तुम्ही प्रवास केला असणार. ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी दोन महिने आधी तिकिट काढावं लागतं, त्यात देखील कधीकधी वेटिंग तिकिट असतं. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की वेटिंग तिकिटाचे देखील वेगवेगळे प्रकार असतात, अशावेळी कोणतं सर्वात आधी कन्फर्म होतं याबद्दल लोकांना नेहमीच प्रश्न असतो. याचबद्दल आज आम्ही या लेखात सांगणार आहोत.
advertisement
2/5
बहुतेक वेळा, रेल्वे तिकीट बुक केल्यानंतर प्रवाशांना वेटिंग तिकीट मिळते. PQWL, TQWL, RLWL आणि GNWL सारखी वेटिंग तिकिटांचे विविध प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे का की या सर्व प्रकारच्या वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता दर्शवतात.
advertisement
3/5
जेव्हा प्रवासी ट्रेनच्या मूळ स्थानकावरून प्रवास करत असतो तेव्हा GNWL प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाते. अशावेळी ही वेटिंग लिस्ट कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
advertisement
4/5
ज्या स्थानकांवर रेल्वेची महत्त्वाची मध्यवर्ती स्थानके आहेत, त्या स्थानकांवरून RLWL प्रतीक्षा यादी जारी केली जाते. परंतु, या प्रतीक्षा यादीची कन्फर्म होण्याची शक्यता GNWL पेक्षा कमी आहे.
advertisement
5/5
PQWL वेटिंग तिकीट रेल्वे मार्गांदरम्यानच्या छोट्या स्थानकांवरून वेटिंग तिकीट खरेदी उपलब्ध आहे. या वेटिंग लिस्टमधून तिकीट कन्फर्म होण्याची शक्यताही खूपच कमी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Indian Railway : ट्रेनचे वेटिंग लिस्ट तिकीटांमध्ये ही असतात वेगवेगळे प्रकार? 'हे' वालं सर्वात आधी होतं कन्फर्म