TRENDING:

SBI मध्ये 4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल 1,40,071 रुपयांचं फिक्स व्याज! ही स्किम कोणती?

Last Updated:
तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल आणि तुम्ही एखादी चांगली स्किम शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण एसबीआयच्या एका भारी स्किमविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7
SBI मध्ये 4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल 1,40,071 रुपयांचं फिक्स व्याज! ही स्किम कोणती?
SBI FD Schemes: आपल्या देशातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना एक फिक्स्ड रिटर्न हवं असतं. यामुळे ते जोखिम नसणाऱ्या गुंतवणूक प्लॅन शोधत असतात. एसबीआयची एक योजना अशीच आहे. यामध्ये तुम्हाला जोखिमेशिवाय बंपर व्याज मिळतं.
advertisement
2/7
भारतीय स्टेड बँक, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. जी आपल्या ग्राहकांना एफडी स्किमवर आकर्षक व्याज ऑफर करते. भारतीय स्टेट बँकमध्ये 7 दिवसांपासून तर 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी अकाउंट ओपन केलं जातं.
advertisement
3/7
भारतीय स्टेट बँकेत एफडी अकाउंटवर 3.05 टक्क्यांपासून तर 7.15 टक्केपर्यंत शानदार व्याज देतंय. चला जाणून घेऊया एसबीआयमध्ये 60 महिन्यांच्या म्हणजेच 5 वर्षांच्या एफडीमध्ये 4 लाख रुपये गुंतवल्यास किती व्याज मिळेल.
advertisement
4/7
भारतीय स्टेट बँक 444 दिवसांची अमृत वृष्टी स्पेशल एफडी स्किमवर सामान्य नागरिकांना सर्वात जास्त व्याज देत आहे. ही बँक अमृत वृष्टी एफडी स्किमवर सामान्य नागरिकांना सर्वात जास्त 6.45 टक्के, वरिष्ठ नागरिकांना 6.95 टक्के आणि अति वरिष्ठ नागरिकांना (80 वर्षांहून अधिक) 7.05 टक्के व्याज देतेय.
advertisement
5/7
यासोबतच एसबीआय 5 वर्षांच्या कालावधीच्या एफडी स्किमवर सामान्य नागरिकांना 6.05 टक्के, वरिष्ठ नागरिकांना 7.05 टक्के आणि अति वरिष्ठ नागरिकांना सर्वात जास्त 7.15 टक्के व्याज देत आहे.
advertisement
6/7
भारतीय स्टेट बँकेत 60 महिन्याच्या एफडी स्किममध्ये 4 लाख रुपये जमा केल्यास सामान्य नागरिकांना मॅच्योरिटीवर 1,40,071 रुपयांच्या फिक्स व्याजासह एकूण 5,40,071 रुपये मिळतील.
advertisement
7/7
भारतीय स्टेट बँकेत 60 महिन्याच्या एफडी स्किममध्ये 4 लाख रुपये जमा केल्यास वरिष्ठ नारगिकांना मॅच्योरिटीवर 1,67,303 रुपयांचं फिक्स व्याजासह 5,67,303 रुपये मिळतील. अति वरिष्ठ नागरिकांना भारतीय स्टेट बँकमध्ये 60 महिन्यांच्या एफडी स्किममध्ये 4 लाख रुपये जमा केल्यास 1,70,097 रुपयांच्या फिक्स्ड व्याजासह एकूण 5,70,097 रुपये मिळतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
SBI मध्ये 4 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल 1,40,071 रुपयांचं फिक्स व्याज! ही स्किम कोणती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल