SBIची अमृत वृष्टी स्पेशल FD स्किम आहे भारी! 2 लाखांच्या एफडीवर मिळतं बंपर व्याज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना आणत असते. आज आपण या बँकेच्या एका स्पेशल एफडी स्किमविषयी जाणून घेऊया. जामध्ये ग्राहकांना एफडीवर बंपर व्याज मिळतं.
advertisement
1/7

SBI FD Schemes: भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. ज्यामध्ये लाखो लोकांचे अकाउंट आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्पेशल स्किमही आणते. यासोबतच नॉर्मल एफडीवरही ग्राहकांना चांगले व्याज मिळते. तुम्ही किमान 7 दिवसांपासून एफडी अकाउंट ओपन करू शकतात. तर जास्तीत जास्त 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी करू शकता.
advertisement
2/7
भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना विविध कालावधीच्या एफडी अकाउंटवर 3.05 टक्के ते 7.05 टक्केपर्यंत व्याज देतेय. आज आपण जाणून घेऊया की, 444 दिवसांच्या एफडीमध्ये 2 लाख रुपये जमा केल्यास किती व्याज मिळेल.
advertisement
3/7
भारतीय स्टेट बँक 444 दिवसांच्या अमृत वृष्टी स्पेशल एफडी स्किमवर सामान्य नागरिकांना सर्वाधिक व्याज देतेय. ही बँक अमृत वृष्टी एफडी स्किमवर सामान्य नागरिकांना सर्वाधित 6.45 टक्के, वरिष्ठ नागरिकांना 6.95 टक्के आणि अति वरिष्ठ नागरिकांना (80 वर्षे किंवा त्याहून जास्त) 7.05 टक्के व्याज देतेय.
advertisement
4/7
एसबीआय 5 ते 10 वर्षांच्या कालावधीच्या एफडी स्किमवर सामान्य नागरिकांना 6.05 टक्के, वरिष्ठ नागरिकांना 7.05 टक्के आणि अति वरिष्ठ नागरिकांना सर्वाधिक 7.15 टक्के व्याज देतेय.
advertisement
5/7
स्टेट बँकेत 444 एफडी स्किममध्ये 2 लाख रुपये जमा केल्यास सामान्य नागरिकांना दिवसांच्यामॅच्योरिटीवर 16,189 रुपयांच्या फिक्स व्याजासह 2,16,189 रुपये मिळतील.
advertisement
6/7
भारतीय स्टेट बँकेत 444 दिवसांच्या एफडी स्किममध्ये 2 लाख रुपयांपर्यंत जमा केल्यास वरिष्ठ नागरिकांना मॅच्योरिटीवर 17,486 रुपयांच्या फिक्स व्याजासह एकूण 2,17,486 रुपये मिळतील. तर अति वरिष्ठ नागरिकांना भारतीय स्टेट बँकेत 444 दिवसांच्या एफडी स्किममध्ये 2 लाख रुपये जमा केल्यास 17,746 रुपयांच्या फिक्स व्याजासह एकूण 2,17,746 रुपये मिळतील.
advertisement
7/7
सर्वात सुरक्षित गुंतवणूक : शेअर बाजारा आणि म्यूच्युअल फंडचा काळ सुरू आहे. पण तरीही जास्तीत जास्त भारतीयांना फिक्स्ड रिटर्न हवं असतं. ज्यामुळे ते एफडीवर विश्वास ठेवतात. बँक एफडीमध्ये शेयर बाजार आणि म्यूच्युअल फंडच्या तुलनेत झिरो रिस्क असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
SBIची अमृत वृष्टी स्पेशल FD स्किम आहे भारी! 2 लाखांच्या एफडीवर मिळतं बंपर व्याज