सुवर्णनगरी जळगावात 4 तासांत सोनं 8 हजारांनी स्वस्त! चांदीही 20 हजारांनी घसरली
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold Silver Latest Rate : सोन्या-चांदीच्या किंमती या जेवढ्या वेगाने वर गेल्या होत्या आता तेवढ्याच वेगाने खाली कोसळताय. आजही सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळतेय.
advertisement
1/5

नितीन नांदुरकर, जळगाव : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, कच्च्या तेलाच्या वाढत्या मागणीसह आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सुवर्णनगरी जळगावच्या सराफ बाजारावर स्पष्टपणे दिसतोय. कारण सोन्याच्या चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण सुरूये.
advertisement
2/5
मार्च महिन्यातील अवघ्या 23 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 34 हजार रुपयांची घसरण नोंदवलीये. विशेष म्हणजे, आजच्या दिवसातच अवघ्या चार तासांत सोन्याचे दर 8 हजारांनी कोसळले, तर चांदीत तब्बल 20 हजारांची मोठी घसरण झाली. या अनपेक्षित घसरणीमुळे सराफ बाजारात ग्राहकांची एकच झुंबड उडालीये.
advertisement
3/5
लग्नसराईचा सीझन आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल होताय. दर घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत दिवसभर खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळतेय.
advertisement
4/5
दरम्यान, आज सोन्याचा दर जीएसटीसह सुमारे 1 लाख 44 हजार रुपये (10 ग्रॅम) इतका असून, चांदीचा दर 2 लाख 30 हजार रुपये (प्रति किलो) इतका नोंदवला गेलाय.
advertisement
5/5
दरातील या मोठ्या घसरणीमुळे आगामी काही दिवसांतही बाजारात तेजी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जातेय. यासोबत लग्नसराईच्या तोंडावर खरेदीदारांसाठी ही बातमी खुप आनंददायी ठरतेय. कारण या काळात सोनं-चांदी खरेदीचे प्रमाण हे खुप वाढते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सुवर्णनगरी जळगावात 4 तासांत सोनं 8 हजारांनी स्वस्त! चांदीही 20 हजारांनी घसरली