Ladki Bahin Yojana Documents: चुकूनही ही चूक नका करू, नाहीतर खात्यावर येणार नाही पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ladki Bahin Yojana 2024 Documents List: एक जरी कागदपत्र राहिलं किंवा ते ऑरिजनल नसेल अथवा त्यामध्ये काही त्रुटी असेल तरीसुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊ शकणार नाही.
advertisement
1/7

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय होत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख आज आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच कोटी पेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्या तरीपण राज्यातील बऱ्याच महिलांनी विविध कारणामुळे अर्ज भरले नाहीत.
advertisement
2/7
ज्यांनी अजूनही अर्ज भरला नाही अशा महिलांना अर्ज भरण्याची आज शेवटची संधी सरकारने दिली आहे. अंगणवाड्यांमध्ये जाऊन महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याने आज अखेरच्या दिवशी अर्ज करण्यासाठी महिलांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला सरकार 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करतं. यावेळी दिवाळी बोनस देखील देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आतापर्यंत तीनवेळा मुदत वाढवली आहे.
advertisement
4/7
1 जुलैपासून ही योजना राज्यात लागू करण्यात आली. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती, ती वाढवून 30 सप्टेंबर करण्यात आली. ही मुदत देखील वाढवून १५ ऑक्टोबर करण्यात आली आहे. यानंतर मात्र कोणतीही मुदतवाढ होणार नाही असं सांगण्यात आलं आहे.
advertisement
5/7
लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र कोणती आहे ते जाणून घेऊया. यातलं एक जरी कागदपत्र राहिलं किंवा ते ऑरिजनल नसेल अथवा त्यामध्ये काही त्रुटी असेल तरीसुद्धा तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होऊ शकणार नाही. तुम्ही या योजनेसाठी पात्र होणार नाही आणि खात्यावर पैसे येणार नाहीत.
advertisement
6/7
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहात याचा दाखला देणं आवश्यक आहे. आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आवश्यक आहे.
advertisement
7/7
महिलेचा जन्म परराज्यात असेल तर पतीचे रेशनकार्ड/मतदान कार्ड/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला या गोष्टी देखील सादर करणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojana Documents: चुकूनही ही चूक नका करू, नाहीतर खात्यावर येणार नाही पैसे