Ladki Bahin Yojana 2024: ही शेवटची संधी, लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन होणार बंद
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ladki Bahin Yojana Last Date: जुलै 2024 पासून महाराष्ट्रात लागू झालेल्या लाडकी बहिन योजनेअंतर्गत, 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांच्या खात्यात 1,500 रुपये ट्रान्सफर केले जात आहेत.
advertisement
1/7

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आज रजिस्ट्रेशन करण्याचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत दोन वेळा ही तारीख वाढवण्यात आली आहे. मात्र आता या तारखेत कोणतीही वाढ होणार नाही. सध्या त्याबाबत कोणताही निर्णय आला नाही. त्यामुळे आजच शेवटची संधी आहे.
advertisement
2/7
ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा ते अपूर्ण आहे अशा सगळ्या महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज तुम्ही लाडकी बहीण योजनेचं रजिस्ट्रेशन पूर्ण करुन घ्या कारण 15 ऑक्टोबरनंतर रजिस्ट्रेशन करता येणार नाही.
advertisement
3/7
जुलै 2024 पासून महाराष्ट्रात लागू झालेल्या लाडकी बहिन योजनेअंतर्गत, 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांच्या खात्यात 1,500 रुपये ट्रान्सफर केले जात आहेत.
advertisement
4/7
1 जुलैपासून हे हप्ते लागू करण्यात आले आहेत. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यावर एकत्र जमा झाला. त्यानंतरचे हप्ते टप्प्या टप्प्याने महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत.
advertisement
5/7
कोणती कागदपत्र लागतात- आधार कार्ड, ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र, बँक खाते, जात प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, शिधापत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा पुरावा (पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाचा पुरावा देणे आवश्यक नाही.), पत्त्याचा पुरावा,जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र
advertisement
6/7
कोण करु शकतं अर्ज- महाराष्ट्रातील रहिवासी महिला या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. महिला अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि गरीब महिला पात्र आहेत.
advertisement
7/7
कोण करु शकतं अर्ज- अर्जदाराच्या नावावर कोणत्याही बँकेत बँक खाते असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. आज शेवटचा दिवस असल्याने अर्ज करण्यासाठी तुफान गर्दी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तातडीनं लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojana 2024: ही शेवटची संधी, लाडकी बहीण योजनेसाठी रजिस्ट्रेशन होणार बंद