Gas Cylinder Booking: घरात गॅस सिलेंडर ठेवणाऱ्यांनो आधी हे वाचा! केंद्र सरकारने बुकिंगसाठी लागू केले नियम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
LPG Gas Cylinder Booking: गॅसची मागणी ही सातत्याने वाढतेय. दरम्यान आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. यामुळे आता सरकार नवनवीन नियम आणतेय.
advertisement
1/7

एक एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं आहे. नव्या वर्षात काही बदल होतात, ज्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होत असतो. यंदाच्या वर्षी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. ज्यामुळेच परिस्थिती पाहता सरकारने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. या संदर्भात, एलपीजी सिलेंडरचा वापर, वितरण आणि किंमतींविषयी महत्त्वाचे काही बदल करण्यात आले आहेत.
advertisement
2/7
हे बदल 1 एप्रिलपासून लागू झालेय. माहितीच्या अभावामुळे उपभोक्ताांना अडचणींचा सामना करावा लागतो. चला जाणून घेऊया 5 नियमांविषयी जे फक्त घरगुती उपभोक्ता नाही तर लहान व्यापाऱ्यांवरही परिणाम करतील.
advertisement
3/7
किंमतीमध्ये मोठा बदल : 1 एप्रिलपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. खरंतर सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे 14.2 किलोग्रामच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. जो दिल्लीमध्ये सध्या 913 रुपयांत मिळतोय.तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोग्रामच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 195.50 रुपयांची वाढ झाली आहे. यासोबतच या सिलेंडरची किंमत वाढून 2,078.50 रुपये झाली आहे. अशा प्रकारे लहान कुटुंब आणि अविवाहित लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या 5 किलोग्रामच्या छोटू सिलेंडरच्या किंमतीतही 51 रुपयांची वाढ झाली आहे. या सिलेंडरची किंमत 700 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
4/7
बुकिंगचा कालावधी वाढला : आतापर्यंत एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी फक्त 21 दिवसांची वाट पाहावी लागत होती. मात्र आता हा लॉक-इन कालवाधी नियम बदलला आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना आता दोन बुकिंगच्या मध्ये 25 दिवसांचं अंतर ठेवावं लागेल. तर ग्रामिण भागांमध्ये हा कालावधी 45 दिवस झाला आहे. हा नियम फक्त 14.2 किलोग्रामच्या घरगुती सिलेंडरवर लागू आहे. तेल कंपन्यांनी हा निर्णय साठेबाजी रोकण्यासाठी आणि पात्र ग्राहकांना योग्य वेळी सिलेंडर उपलब्ध व्हावे या उद्देशाने घेतला आहे.
advertisement
5/7
पीएनजी कनेक्शनची डेडलाइन : ज्या क्षेत्रामध्ये पाइपलाइनने नैसर्गिक गॅस (पीएनजी) उपलब्ध आहे. तिथे सरकारने पर्यावरणाच्या हितासाठी एक कठोर निर्णय घेतलाय. लेटेस्ट आदेशांनुसार, जर पीएनजी उपलब्ध असलेल्या क्षेत्राच्या ग्राहकांनी 24 जूनपर्यंत पीएनजी कनेक्शन घेतले नाही, तर त्यांचे एलपीजी कनेक्शन पूर्ण बंद केले जातील. ही कालमर्यादा सिलेंडर परिवहनाचं ओझं हलकं करणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी लागू केली आहे. तुमच्या क्षेत्रात पाइपलाइन गॅस उपलब्ध असेल तर तुम्ही अवश्य कनेक्शन घेणं गरजेचं राहील.
advertisement
6/7
बायोमेट्रिक ई-केवायसी अनिवार्य : सरकारने सिलेंडरवर मिळणारी सब्सिडीच्या दुरुपयोग रोखण्यासाठी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन म्हणजेच ई-केवायसी अनिवार्य केली आहे. ग्राहक संबंधित तेल कंपन्यांच्या मोबाईल अॅप 'आधार फेस आरडी' च्या माध्यमातून घर बसल्याही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यासाठी त्यांनी गॅस एजेंसीला जाण्याची गरज नाही. पीएमयूवाय लाभार्थ्यांना या आर्थिक वर्षात फक्त एकदा ही प्रक्रिया करावी लागेल. केवायसी पूर्ण झाली नाही तर बुकिंग रद्द होण्याचा धोका आहे.
advertisement
7/7
एलपीजी एटीएम : न्यूज 18 तेलगूच्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियमने गुरुग्राममध्ये देशातील पहिला 24x7 एलपीजी एटीएम लॉन्च केलाय. यामुळे सिलेंडर घेणे हे एटीएममधून पैसे काढण्यासारखं सोपं झालंय. हे लवकरच देशात विस्तारित केलं जाईल. आपत्कालिन परिस्थितीत हे ग्राहकांसाठी खुप बेस्ट ठरतंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gas Cylinder Booking: घरात गॅस सिलेंडर ठेवणाऱ्यांनो आधी हे वाचा! केंद्र सरकारने बुकिंगसाठी लागू केले नियम