LPG, पेट्रोल-डिझेलवर सरकारच्या 5 मोठ्या अपडेट! पाहा याचा सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
जगभरात वाढत्या युद्ध तणावादरम्यान भारत सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसच्या उपलब्धतेविषयी महत्त्वाच्या 5 घोषणा केल्या आहेत. या घोषणा कोणत्या आहेत, चला जाणून घेऊया.
advertisement
1/8

जगभरात युद्धाची परिस्थिती आहे. या दरम्यान पेट्रोल-डिझेल किंवा एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती तुम्हालाही वाटतेय का? याविषयी तुम्ही घाबरलेले असाल तर शांत व्हा. केंद्र सरकारने सर्वसामान्य आणि मीडिल क्लासला दिलासा देत स्पष्ट केलंय की, घाबरण्याची काहीच गरज नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने विश्वास दाखवलाय की, देशात इंधनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सप्लाय चेनविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. सरकारने सामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेता आवश्यक पाऊलं उचलली आहेत.
advertisement
2/8
सरकारने स्पष्ट निर्देश दिलेय की, वाहन चालकांना पेट्रोल पंपावर गर्दी करणे किंवा गॅस सिलेंडरची अडव्हान्स बुकिंग करण्याची काहीच गरज नाही. देशातील सर्व रिफायनिंग पूर्णपणे सक्षमतेने काम करताय. आपल्याजवळ कच्च्या तेलाचा साठा भरपूर आहे. मंत्रालयाने म्हटलंय की, लोकांनी संयम ठेवावा आणि फक्त गरजेच्या हिशोबाने साहित्य खरेदी करावं. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची स्थिती असली तरीही भारताची ऊर्जा सुरक्षा पूर्णपणे मजबूत आणि देशांतर्गत स्तरावर कोणतीही कमतरता नाही.
advertisement
3/8
सामान्य लोकांच्या सुविधेसाठी सरकारने 5 किलोचे लहान गॅस सिलेंडर मिळवणं आणखी सोपं केलंय. आता कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या गॅस एजेंसीवर जाऊन फक्त ओळखपत्र दाखवून सिलेंडर खरेदी करू शकते. यासाठी कोणत्याही अॅड्रेस प्रूफची गरज नाही. आकड्यांनुसार गेल्या महिन्यात 23 तारखेपासून आतापर्यंत जवळपास 57 लाख लहान सिलेंडर विकले गेले आहेत. जे लोक भाड्याने राहतात किंवा ज्यांच्याजवळ डॉक्यूमेंट नाहीत, त्यांच्यासाठी हे खुप फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
4/8
डिजिटल इंडियाचा परिणाम गॅस बुकिंगवरही स्पष्ट दिसतोय. सध्या ऑनलाइन गॅस बुकिंगचा आकडा 95 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा विक्रमी आकडा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण देशभरात 51 लाख घरगुती एलपीजी सिलेंडरची होम डिलिव्हरी केली गेली आहे. यावरुन कळतं की, सरकारचा सप्लाय सिस्टम खुप मजबूत आहे. यासोबतच सरकार लोकांना पीएनजी, इंडक्शन स्टोव्ह आणि इलेक्ट्रिक कुकटॉप सारखे ऑप्शन स्विकारण्यासाठी प्रेरित करत आहे. जेणेकरुन पारंपारिक इंधनावरील अवलंबून राहणं कमी होईल.
advertisement
5/8
पाइप्ड नॅच्युरल गॅस (पीएनजी) च्या बाबतीतही तेजी दिसतेय. गेल्या महिन्यापासून आतापर्यंत साडे तीन लाखांहून जास्त नवीन घरात गॅस सप्लाय सुरू झाला आहे. जवळपास 3 लाख 80 हजार लोकांनी नवीन कनेक्शनसाठी आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. दुसरीकडे शिपिंग मंत्रालय समुद्री रस्त्यांहून जाणाऱ्या व्यापारवर बारीक लक्ष ठेवत आहे. युद्धासारखी स्थिती असुनही आपल्या भारतीय जहाजांच्या प्रवासावर आणि आपल्या नाविकांच्या सुरक्षेत कोणतीच कमतरता राहू दिली जाणार नाही हे भारत सरकारकडून सांगितलं जातंय.
advertisement
6/8
महत्त्वाची बातमी म्हणजे, 'ग्रीन सांवी' नावाची एलपीजी जहाज काल सुरक्षित पद्धतीने होर्मुज जलडमरूमध्य पार करुन गेलंय. या जहाजावर 46,650 मीट्रिक टन गॅसचा माल आहे. यात 25 भारती नाविक उपलब्ध आहे. सध्या पश्चिमी फारसच्या खाडी क्षेत्रात भारताचे 17 हजार जहाज उपलब्ध आहे. ज्यात 460 भारतीय नाविक ड्यूटीवर तैनात आहेत. सरकार या सर्वांच्या सुरक्षेसाठी सातत्याने मॉनिटरिंग करतेय. जेणेकरुन देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय इंधनाचा सप्लाय सुरू राहील.
advertisement
7/8
हवाई क्षेत्रातही परिस्थिती सुधारतेय. 28 फेब्रुवारीपासून आतापर्यंत त्या प्रभावित क्षेत्रामधून जवळपास 6.75 लाख प्रवासी सुरक्षित भारतात परतले आहेत. अबू धाबीमध्ये झालेल्या हल्ल्यात पाच भारतीय जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते. यातील चार जणं हे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळालाय. एकावर उपचार सुरू आहेत. भारतीय मिशन विदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी पूर्णपणे तयार आहे. यासोबतच स्थानिक अधिकाऱ्यांसोबत ताळमेळ बसवून आपल्या नागरिकांना सुरक्षा आणि उपचार मिळावेत याची काळजी घेत आहेत.
advertisement
8/8
सरकारने स्पष्ट केलंय की, सध्या भारतात ऊर्जेची स्थिती ही मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय दबाव असुनही कच्चे तेल किंवा आयात आणि गॅसच्या सप्लाय सुरळित सुरू आहे. युद्धामुळे आपल्या सप्लाय चेनवर परिणाम होऊ नये म्हणून राजनैतिक स्तरावर उपाय केले गेले आहेत. नागरिकांना सांगितलं जातंय की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवावा. ज्यामुळे सिस्टमवरील दबाव कमी होईल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूतीने प्रगत होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
LPG, पेट्रोल-डिझेलवर सरकारच्या 5 मोठ्या अपडेट! पाहा याचा सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम