Success Story : लोकांनी फेकून दिलं, नंदनने त्याचं 'सोनं' करून दाखवलं, उभारली 1.5 कोटींची कंपनी!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
भट यांनी टाकून दिलेल्या प्लॅस्टिकमधून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्या या व्यवसायातून ते वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
1/5

गेल्या काही वर्षापासून प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणत केला जात आहे. वापरलेल्या प्लॅस्टिकचा देखील अनेकजण नीट विल्हेवाट लावत नाहीत.ते प्लॅस्टिक वर्षानुवर्षे तसंच राहातं आणि त्यामुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं.
advertisement
2/5
मात्र, काहीजण या समस्यांमध्ये संधी शोधतात. त्यापैकी एक म्हणजे इकोकारी संस्थापक नंदन भट. भट यांनी टाकून दिलेल्या प्लॅस्टिकमधून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्या या व्यवसायातून ते वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
3/5
इकोकारीमध्ये काम करणाऱ्या फॅशन डिझायनर गितिका महाजन यांनी सांगितलं की, नंदन भट यांनी इकोकारीची स्थापना 2020 साली केली. काही वर्षांच्या कालावधीत या व्यवसायाने भारतातच नव्हे, तर परदेशातही आपली उत्पादने निर्यात करण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
4/5
गेल्या 5 ते 6 वर्षांच्या कालावधीत इकोकारीने तब्बल 50 ते 60 लाख टाकून दिलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचं संकलन करून त्याचा पुनर्वापर केला आहे.
advertisement
5/5
या कापडापासून विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात जसे की पायपुसणे, शोभेच्या वस्तू, लॅपटॉप पिशव्या, बॅगा, डायरी कव्हर, पाकिटं, प्लांटर्स अशा अनेक आकर्षक वस्तू बनवल्या जातात. या वस्तू ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून उपलब्ध आहेत. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असून, आज या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर दीड कोटीपेक्षाही जास्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story : लोकांनी फेकून दिलं, नंदनने त्याचं 'सोनं' करून दाखवलं, उभारली 1.5 कोटींची कंपनी!