30 हजार रुपयांची लाच भोवली, अधिकाऱ्यांनी बॅगा उघडल्या आणि चाट पडले, नोटा मोजायला मशीन कमी पडल्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ओडिशातील खाण विभागाचे उपसंचालक देबव्रत मोहंती लाच प्रकरणात अटकेत, भुवनेश्वर येथून ४ कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त, मोठ्या प्रमाणात मालमत्ता उघड.
advertisement
1/8

ओडिशामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. खाण विभागाचे उपसंचालक देबव्रत मोहंती यांच्या भुवनेश्वर येथील निवासस्थानावर धाड टाकली, तब्बल ४ कोटी रुपयांहून अधिक बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे.
advertisement
2/8
विशेष म्हणजे, अवघ्या ३० हजार रुपयांच्या लाचेच्या प्रकरणातून सुरू झालेला हा तपास थेट कोटींच्या घबाडापर्यंत पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार, एका परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून त्याचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आणि कोळसा वाहतुकीची परवानगी देण्यासाठी मोहंती यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.
advertisement
3/8
मंगळवारी रात्री ही लाच स्वीकारताना दक्षता विभागाने त्यांना रंगेहात पकडले. या ट्रॅप नंतर विभागाने मोहंती यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. दक्षता विभागाने जेव्हा मोहंती यांच्या पटिया येथील 'नेचर्स क्रेस्ट अपार्टमेंट'मधील फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले.
advertisement
4/8
घरातील कपाटं आणि ट्रॉली बॅग्समध्ये नोटांची पुडकी गच्च भरलेली होती. या एकाच ठिकाणाहून ४ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. नोटा मोजण्याचे काम अद्याप सुरू असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, कटक येथील त्यांच्या कार्यालयातून १ लाख २० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
advertisement
5/8
केवळ रोख रक्कमच नाही, तर मोहंती यांची अवाढव्य मालमत्ताही समोर आली आहे. भुवनेश्वरमधील पाहाडा भागात २४०० स्क्वेअर फूटची दोन मजली आलिशान इमारत. सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने.
advertisement
6/8
भद्रक येथील वडिलोपार्जित घर आणि कटक येथील कार्यालयीन दालनाचीही झडती सुरू आहे. देबव्रत मोहंती यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
7/8
खाण क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याने ओडिशाच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
8/8
"आमचा तपास अजूनही सुरू असून, जप्त केलेल्या मालमत्तेची पडताळणी पूर्ण झाल्यावर अधिक माहिती समोर येईल," असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
30 हजार रुपयांची लाच भोवली, अधिकाऱ्यांनी बॅगा उघडल्या आणि चाट पडले, नोटा मोजायला मशीन कमी पडल्या