Silver Loan: सोन्याप्रमाणेच चांदी गहाण ठेवली तर पैसे मिळतात? आधी वाचा या गोष्टी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Silver Loan: आपण अनेकदा गोल्ड लोन घेत असतो. पण चांदीवरही लोन मिळतं का? आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
1/5

Silver Loan News: सोनं हे आपली सर्वात फायदेशीर गुंतवणूक ठरत असते. कारण अडचणीच्या वेळी सोनं गहाण ठेवून आपण कर्ज घेऊ शकतो. कोणतीही एमर्जेंसी असो किंवा मग लहान बिझनेस सुरू करायचा असेल. लोक अनेकदा गोल्ड लोन घेताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का की चांदीवरही लोन घेता येतं? तुम्ही तुमचे चांदीचे नाणे गहाण ठेवण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा नंतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/5
चांदीवर लोन घेतल्यास किती पैसे मिळतील? : आपल्याला वाटत असतं की, चांदीची किंमत 1 लाख रुपये असेल तर त्यावर पूर्ण 1 लाख रुपयांचं लोन मिळेल. पण खरंतर बँक किंवा लोन देणाऱ्या संस्था या चांदीच्या एकूण किंमतीच्या केवळ एक भागच लोनच्या रुपात देतात. सामान्यतः तुम्हाला चांदीच्या किंमतीच्या 75% ते 85% पर्यंतच लोन मिळतं. इतर भाग 'सेफ्टी बफर' म्हणून तुमच्याजवळ ठेवले जाते.
advertisement
3/5
लेंडर्स सावध कार राहतात? : सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार जास्त होतात. आज भाव वाढले असतील तर उद्या तेजीही पाहायला मिळू शकते. या रिस्कपासून बचाव करण्यासाठी कंपन्या पूर्ण पैसे देत नाहीत. भविष्यात चांदीच्या किंमती खाली आल्या तरीही बँकेचा पैसा सुरक्षित राहावा म्हणून बँका असं करतात.
advertisement
4/5
लोन कोणत्या चांदीवर मिळतं? : दागिने आणि नाणे हे गहाण ठेवणे सर्वात सोपं आहे कारण याची शुद्धता मापने सोपं असतं. भांडी आणि सजावटीचं साहित्य अनेकदा बँका हे स्वीकारत नाही किंवा यांची व्हॅल्यू कमी लावतात.लक्षात ठेवा की, बँकेला तुमच्या पैंजण किंवा भांड्याची डिझाइन किंवा मेकिंग चार्जेसशी काहीच घेणंदेणं सतं. ते फक्त चांदीचं वजन आणि शुद्धतेची किंमत लावतात.
advertisement
5/5
जास्त चांदी असेल तर लोन जास्त मिळतं का? : हे गरजेचं नाही. चांदीची प्रति ग्राम किंमत ही सोन्यापेक्षा खुप कमी असते. यामुळेच मोठ्या रकमेच्या लोनसाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात चांदीची गरज असते. सोबतच अनेक बँकांची चांदी स्विकारण्याची एक लिमिट असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Loan: सोन्याप्रमाणेच चांदी गहाण ठेवली तर पैसे मिळतात? आधी वाचा या गोष्टी