TRENDING:

Post office Scheme: 1000 रुपये गुंतवून बना लखपती, पोस्टाची योजना देते बँकेपेक्षा जास्त व्याज

Last Updated:
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी एफडी व्याजदर कमी केले आहेत, पण पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (KVP) योजनेत 7.5% व्याजदर कायम आहे. 115 महिन्यांत पैसे दुप्पट होतात.
advertisement
1/7
1000 रुपये गुंतवून बना लखपती, पोस्टाची योजना देते बँकेपेक्षा जास्त व्याज
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी ठेवींवरील (एफडी) व्याजदर कमी केले आहेत. मात्र, पोस्ट ऑफिसने आपल्या बचत योजनांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. अशाच एका योजनेंतर्गत पोस्ट ऑफिस तुमचे पैसे ठरावीक कालावधीत थेट डबल करते. ही योजना म्हणजेच किसान विकास पत्र (KVP).
advertisement
2/7
किसान विकास पत्र (KVP) ही केंद्र सरकारच्या नियंत्रणाखालील पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी एक खात्रीशीर बचत योजना आहे. या योजनेत सुरुवातीस एकरकमी गुंतवणूक केली जाते आणि ठरावीक कालावधीनंतर तुमचे पैसे दुप्पट होतात.
advertisement
3/7
सध्या KVP वर 7.5% व्याजदर लागू आहे. तुम्ही या योजनेत किमान 1000 रुपये गुंतवू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही – म्हणजेच 1 लाख किंवा 1 कोटी, कितीही रक्कम गुंतवता येते.
advertisement
4/7
या योजनेत गुंतवलेले पैसे 115 महिन्यांत, म्हणजेच 9 वर्षे आणि 7 महिने पूर्ण झाल्यानंतर दुप्पट होतात. KVP ही फिक्स रिटर्न योजना आहे – म्हणजे व्याज आणि परतावा दोन्ही निश्चित असतो.
advertisement
5/7
सिंगल आणि जॉइंट अकाउंटचा पर्याय उपलब्ध आहे. या योजनेत सिंगल अकाउंट तसेच जॉइंट अकाउंट सुरू करता येतो. बँकेतील FD पेक्षा जास्त व्याजदर इथे तुम्हाला मिळणार आहे.
advertisement
6/7
जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त तीन व्यक्तींची नावे जोडता येतात. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते आणि केंद्र सरकारची हमी असल्यामुळे या योजनेतील गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित आहे.
advertisement
7/7
तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्टात जाऊन खातं उघडू शकता. तिथे खातं उघडल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 18 वर्षांवरील सर्वांना या योजनेत पैसे गुंतवता येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Post office Scheme: 1000 रुपये गुंतवून बना लखपती, पोस्टाची योजना देते बँकेपेक्षा जास्त व्याज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल