TRENDING:

PPF स्किमध्ये दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्योरिटीवर किती पैसे मिळतील? कॅलक्युलेशन पाहाच

Last Updated:
आजच्या काळात सर्वांनाच सेव्हिंगचं महत्त्वच समजलं आहे. अशावेळी प्रत्येकजण हा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करत असतो. सुरक्षित गुंतवणुकीतील एक स्किम म्हणजे पीपीएफ योजना आहे.
advertisement
1/7
PPF स्किमध्ये दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्योरिटीवर किती पैसे मिळतील? कॅलक्युलेशन पाहाच
PPF Scheme: आपण पैसे गुंतवत असतो तेव्हा आपल्याला त्यातून भरपूर रिटर्नची अपेक्षा असते. पण एवढंच महत्त्वाचं नसतं तर फिक्स रिटर्न आणि झिरो जोखिम असेल तर आपण निश्चित होऊन सेव्हिंग करू शकतो. अशीच एक योजना म्हणजे पीपीएफ योजना आहे. ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाते.
advertisement
2/7
पीपीएफ स्किमवर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळतं. आज आपण पीपीएफ स्किमवषयी जाणऊन घेणार आहोत. यासोबतच पीपीएफ स्किममध्ये दरवर्षी 1 लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्योरिटीवर एकूण किती रक्कम हातात मिळेल याचं गणितही आपण करूया.
advertisement
3/7
तुम्ही ही स्किम पोस्ट ऑफिससोबतच बँकांमध्येही ओपन करू शकता. पीपीएफ अकाउंट पीपीएफ स्किम अंतर्गत एक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.
advertisement
4/7
या स्किम अंतर्गत तुम्हाला एका आर्थिक वर्षात किमान एकदा 500 रुपये जमा करणं अनिवार्य असतं. तुम्ही एका वर्षात किमान 500 रुपयेही जमा करु शकले नाही तर तुमचं अकाउंट बंद होतं. काही दंड भरुन तुम्ही हे अकाउंट चालूही करू शकता.
advertisement
5/7
या स्किममध्ये तुम्ही तुमच्या सुविधेनुसार एकदाच किंवा मग वर्षातून 12 वेळा पैसे टाकू शकता. पीपीएफ अकाउंट हे 15 वर्षानंतर मॅच्योर होते.
advertisement
6/7
तुम्ही तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवले तर 15 वर्षानंतर म्हणजे मॅच्योरिटीवर तुम्हाला एकूण 27,12,139 रुपये मिळतील. ज्यात तुमची गुंतवणूक ही 15 लाख रुपये असेल तर व्याजाचे 12,12,139 लाख रुपये यात असतील.
advertisement
7/7
पीपीएफ अकाउंटसह तुम्ही अनेक सुविधा मिळतात. पीपीएफ अकाउंटसह तुम्ही सहज लोनही घेऊ शकता. पीपीएफक अकाउंट ओपन केल्याच्या 5 वर्षांनंतर तुम्ही यातून पैसेही काढू शकतात. हे पैसे तुम्ही गंभीर परिस्थिती, मुलांचं शिक्षण, आजारपण यासाठी काढू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
PPF स्किमध्ये दरवर्षी 1 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्योरिटीवर किती पैसे मिळतील? कॅलक्युलेशन पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल