SBI की PNB 5 वर्षांच्या FD वर कोणती बँक देते सर्वात जास्त रिटर्न्स?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शेअर मार्केट किंवा सोनं दोन्ही पैकी सध्या गुंतवणूक करणं म्हणजे रिस्कच आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सगळे FD कडे वळत आहेत. यामध्ये पैसे बुडण्याची भीती नसते. शिवाय व्याजदर कमी का असेना पण निश्चित मिळतं. जर तुम्ही सुरक्षित आणि निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर फिक्स्ड डिपॉझि हा एक लोकप्रिय पर्याय आहे. विशेषतः 5 वर्षांच्या मुदतीसाठी 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर भारतातील दोन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) या पैकी कोणती बँक जास्त रिटर्न देते ते सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
1/7

SBI मध्ये 5 वर्षांसाठी जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 6.50 टक्के व्याजदरानुसार अंदाजे परतावा 3, 80, 420 रुपये मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम तुम्हाला 13,80,420 रुपये मिळणार आहे. तुम्ही गुंतवणूक करताना तुम्हाला हे पैसे मॅच्युरिटीनंतर हवे की दर महिन्याला अथवा तीन महिन्यांला हवेत हे देखील बँकेत फॉर्म भरताना लिहून देऊ शकता.
advertisement
2/7
ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI मध्ये 10 लाख रुपये गुंतवले तर 7.50 टक्के व्याजदर तुम्हाला मिळेल. 10 लाखावर तुम्हाला 4 लाख 49 हजार 948 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहे.
advertisement
3/7
PNB बँकेत 5 वर्षांसाठी जर तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 6.50 टक्के व्याजदरानुसार अंदाजे परतावा 3, 80, 420 रुपये मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम तुम्हाला 13,80,420 रुपये मिळणार आहे. तुम्ही गुंतवणूक करताना तुम्हाला हे पैसे मॅच्युरिटीनंतर हवे की दर महिन्याला अथवा तीन महिन्यांला हवेत हे देखील बँकेत फॉर्म भरताना लिहून देऊ शकता.
advertisement
4/7
ज्येष्ठ नागरिकांसाठी PNB मध्ये 10 लाख रुपये गुंतवले तर 7 टक्के व्याजदर तुम्हाला मिळेल. 10 लाखावर तुम्हाला 4 लाख 14 हजार 778 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीनंतर एकूण रक्कम 14 लाख 14 हजार 778 रुपये मिळणार आहे.
advertisement
5/7
सामान्य ग्राहकांसाठी SBI आणि PNB दोन्ही बँकांच्या ५ वर्षांच्या FD मध्ये 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मुदतपूर्तीनंतर समान परतावा मिळतो. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या रिटर्नमध्ये फरक आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही आई वडिलांच्या नावावर ते ठेवू शकता.
advertisement
6/7
ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI ची 5 वर्षांची FD अधिक फायदेशीर ठरते. SBI मध्ये 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मुदतपूर्तीनंतर 14,49,948 मिळतात, तर PNB मध्ये याच गुंतवणुकीवर 14,14,778 मिळतात. याचा अर्थ, ज्येष्ठ नागरिकांना SBI च्या FD मध्ये 35,170 रुपयांचा जास्त रिटर्न मिळतो.
advertisement
7/7
त्यामुळे, जर तुम्ही सामान्य ग्राहक असाल, तर दोन्ही बँकांच्या योजना तुमच्यासाठी समान परतावा देतील. मात्र, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर ५ वर्षांच्या FD साठी SBI तुम्हाला PNB पेक्षा जास्त परतावा देऊ शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या गरजा आणि इतर योजनांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.