TRENDING:

चांदीचं सुपरफास्ट रॉकेट जमिनीवर आपटलं! 2 लाखांच्या खाली आल्या किंमती, सोन्यालाही लोअर सर्किट

Last Updated:
Silver Crash Updates : चांदीच्या किंमती आतापर्यंत सर्वात मोठी घसरण झाली आहे. फक्त दोन महिन्यात चांदीच्या किंमती या 4.25 लाख प्रति किलोवरुन 2 लाखांच्या खाली पोहोचल्या आहेत.
advertisement
1/7
चांदीचं सुपरफास्ट रॉकेट जमिनीवर आपटलं! 2 लाखांच्या खाली आल्या किंमती, सोन्यालाही लोअर सर्किट
Silver Crash Latest Updates : सोन्या-चांदीच्या किंमतींनी गेल्या वर्षाच्या सुरुवातीला रॉकेटची स्पीड पकडली होती. यामध्ये चांदीने तर सुपरफास्ट वेग पकडला होता. चांदीचं रॉकेट हे सुपरफास्ट वेगाने धावत होतं. पण कोणालाच अंदाज नसेल की, केवळ 50 दिवसात सोन्या-चांदीच्या किंमतींची दुरावस्था होणार आहे. विशेषतः चांदी तर जमिनीवर आपटली आहे.
advertisement
2/7
29 जानेवारी 2026 ला चांदीच्या किंमती या 4.25 लाख रुपये प्रति होत्या. ज्यामुळे खरेदीदाराचं टेन्शन वाढलं होतं. मात्र आता खरेदीदारांसाठी गुड न्यूज आहे. कारण तिच सुपरफास्ट वेगाने धावणारी चांदी आता 2 लाखंच्याही खाली आलीये.
advertisement
3/7
फक्त दोन महिन्यांच्या आत चांदी 2.25 लाख रुपये किलोंनी स्वस्त झालीये. सोमवारी ट्रेडिंग दरम्यान चांदीची किंमत 2 लाख रुपयांपासून खाली आली. तर सोन्यामध्ये 10 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलंय.
advertisement
4/7
इराण आणि अमेरिकेत युद्ध सुरूच आहे. ज्यामुळे जगभरात महागाई वाढण्याचा धोका प्रचंड वाढलाय. ज्यामुळे सोन्या-चांदीची मोठी विक्री सुरू आहे. आठवड्याच्या व्यापाराच्या पहिल्या दिवशी सोमवारी चांदीच्या भावात 26000 रुपये प्रति किलोची घसरण दिसली आहे. तर यामुळे आता चांदीच्या किंमती कोसळून 199643 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या आहेत.
advertisement
5/7
चांदीनंतर सोन्याचे भावही कोसळले :सोन्याविषयी बोलायचं झाल्यास, संकटामध्ये सोनं नेहमीच आपल्याला मदत करत असते. पण चांदीची अवस्था पाहून सोन्यावरुनही गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगलाय. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याला 10 टक्के लोअर सर्किट लागलंय. ज्यामुळे सोन्याचा भाव 14000 रुपयांनी खाली कोसळून प्रति 10 ग्राम 1.30 लाख रुपयांहून खाली आला आहे.
advertisement
6/7
युद्धामुळे आर्थिक संकट वाढतंय. जगभरातील शेअर बाजारात भुकंप आलाय. भारतीय बाजारामध्येही तणावाचे वातावरण आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये 1800 अंकांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. तर निफ्टी कोसळून 22500 रुपयांवर पोहोचलीये. भारतीय बाजार आपल्या उच्च स्थानावरुन 15 टक्क्यांनी खाली आलाय.
advertisement
7/7
सोन्या-चांदीत गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायाल मिळतेय. सर्वात आधी अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाने सोन्या-चांदीवर दबाव वाढवलाय. फेडरल रिझर्व्हने व्याजदरांना स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये सोनं-चांदीच्या किंमती या खुप कमी झाल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
चांदीचं सुपरफास्ट रॉकेट जमिनीवर आपटलं! 2 लाखांच्या खाली आल्या किंमती, सोन्यालाही लोअर सर्किट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल