Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ऑलटाइम हायवर, भारतातही 2 लाख पार, आणखी किती वाढणार दर?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
चांदीने आंतरराष्ट्रीय बाजारात ६२.५० डॉलर प्रति औंसचा उच्चांक गाठला असून भारतात दर २ लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष दरवाढीकडे.
advertisement
1/6

ज्याची भीती होती अखेर तेच घडलं आहे. चांदीने पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या दरवाढीमुळे चांदीचे दर वाढले आहेत. भारतात चांदीने 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दराने आज नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदीचा भाव ६२.५० डॉलर प्रति औंस या आपल्या नवीन सर्वकालीन उच्चांकावरपोहोचला आहे.
advertisement
2/6
या विक्रमी तेजीमुळे आता भारतीय बाजारातही चांदीचा दर २ लाख रुपये प्रति किलो च्या पुढे गेला आहे, जो एक मोठा रेकॉर्ड आहे. घरेलू बाजारातील चांदीच्या किंमती थेट आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क आणि उद्योगांकडून असलेल्या मजबूत मागणीमुळे वाढल्या आहेत.
advertisement
3/6
आज, ११ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात चांदी २००० रुपये ने महाग झाली आहे. चेन्नईमध्ये चांदीचा दर २,०९,००० रुपये प्रति किलोच्या पातळीवर आहे. दिल्लीत चांदीचा दर २,०१,००० रुपये प्रति किलो झाला आहे. चांदीचे दर वाढल्याने त्याचा फायदा ETF मध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांनाही झाला आहे. नव्या वर्षापर्यंत चांदी 2 लाख 20 हजारकडे जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
4/6
चांदीने आपला जुना उच्चांक गाठला आहे आणि आता किती दरवाढ होते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या तेजीमागे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर आलेले आर्थिक आकडे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने डिसेंबरच्या बैठकीत अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा व्याजदरात कपात केली.
advertisement
5/6
व्याजदर कमी झाल्यामुळे डॉलर आणि बॉन्ड यील्ड कमकुवत झाले. परिणामी, गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूंमध्ये खरेदी वाढवली. फेडच्या या 'नरम' धोरणामुळे डॉलर इंडेक्सही दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर (९८.५८) घसरला, ज्यामुळे चांदीला मोठा आधार मिळाला.
advertisement
6/6
चांदीला सध्या दोन मुख्य कारणांमुळे जोरदार मागणी मिळत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता असल्याने गुंतवणूकदार चांदीला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानून खरेदी करत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रांकडून चांदीला असलेली औद्योगिक मागणी अत्यंत मजबूत आहे. या क्षेत्रांमधील वाढत्या मागणीमुळेही किंमतींना सतत आधार मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Silver Price: आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ऑलटाइम हायवर, भारतातही 2 लाख पार, आणखी किती वाढणार दर?