TRENDING:

Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं! कोकण ते विदर्भ पुन्हा अलर्ट, 11 फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: कोकण ते विदर्भ महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
महाराष्ट्रात वारं फिरलं! कोकण ते विदर्भ पुन्हा अलर्ट, 11 फेब्रुवारीचं हवामान अपड
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात स्पष्ट बदल दिसून येत आहे. हिवाळ्याची थंडी आता बहुतांश भागांत मागे पडली असून दिवसेंदिवस उष्णता वाढताना दिसत आहे. 11 फेब्रुवारी रोजी राज्यभर हवामान कोरडे राहणार असून सकाळी सौम्य गारवा आणि दुपारी चांगलीच उष्णता जाणवेल. कोकण ते विदर्भ आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
आज मुंबईसह परिसरात थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. सकाळी फारसा गारवा जाणवणार नाही आणि दुपारी उकाडा जाणवेल. हवामान कोरडे आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसांतही उष्णतेची तीव्रता अशीच राहणार आहे.
advertisement
3/5
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये सकाळी थोडा गारवा जाणवेल, मात्र दुपारी सूर्यप्रकाशामुळे वातावरण चांगलेच तापलेले राहील. कालच्या तुलनेत आज तापमान अधिक राहील. कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सअसदरम्यान आणि किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसदरम्यान असेल. एकंदरीत हवामान कोरडे आणि उबदार राहील.
advertisement
4/5
मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता अधिक जाणवेल. ग्रामीण भागात सकाळी सौम्य गारवा असेल, पण दुपारच्या वेळेत उकाडा वाढलेला राहील. कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान तर किमान तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअसदरम्यान राहील. हवामान पूर्णपणे कोरडे राहील.
advertisement
5/5
एकंदरीत 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे, निरभ्र आणि उष्ण राहील. थंडीचा प्रभाव आता फारसा उरलेला नाही. मंगळवारच्या तुलनेत आज तापमान जास्त राहील आणि पुढील काही दिवसांतही उष्णतेतील वाढ कायम राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं! कोकण ते विदर्भ पुन्हा अलर्ट, 11 फेब्रुवारीला कसं असेल हवामान?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल