काँग्रेस नेत्याशी लग्न अन् विद्या बालनसोबत करायचा होता रोमान्स, फिल्म सोडून कॉन्ट्रोवर्सीमुळेच चर्चेत असते अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जी तिच्या कामापेक्षा जास्त कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीला काँग्रेस नेत्याशी लग्न करायचं होतं. इतकंच काय तर अभिनेत्री विद्या बालनसोबत रोमान्स करायचा होता.
advertisement
1/10

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या कामाशिवाय कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत राहिले आहेत. अनेक कलाकार त्यांच्या अफेअर, इंडस्ट्रीतील भांडणं, सिनेमातील बोल्ड सीन्स यामुळे चर्चेत राहिले आहेत.
advertisement
2/10
बॉलिवूडची अशीच एक अभिनेत्री जी तिच्या कामापेक्षा जास्त कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीला काँग्रेस नेत्याशी लग्न करायचं होतं. इतकंच काय तर अभिनेत्री विद्या बालनसोबत रोमान्स करायचा होता. तिनं खुलेआम हे सांगितलं होतं.
advertisement
3/10
अभिनेत्रीच्या कॉन्ट्रोवर्सी इथेच थांबल्या नाही तर तिने स्वत:च्याच मृत्यूची अफवा पसरवली होती. अनेकांनी तिला श्रद्धांजली देखील वाहिली होती. स्वत:च्या मृत्यूची माहिती देणं हा तिच्या मार्केटिंगचा भाग होता असं तिनं सांगितलं होतं.
advertisement
4/10
ही अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि न्यूड फोटोशूटमुळेही चर्चेत आली होती. तिनं सुंदर दिसण्यासाठी तिच्या शरीरावर अनेक सर्जरी केल्या होत्या. बोल्ड दिसण्यासाठी तिनं ब्रेस्ट इम्प्लान्ट केलं होतं. त्यानंतर ते काढून त्याबाबत जनजागृती केली होती.
advertisement
5/10
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजेच शर्लिन चोप्रा. शर्लिन चोप्राने कदाचित अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले नसेल, परंतु ती अजूनही चर्चेत आहे. 'कामसूत्र 3डी' आणि 'दिल बोले हडिप्पा' सारख्या मोजक्या सिनेमांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
advertisement
6/10
शर्लिन चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वात धाडसी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या फॅशन निवडी आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट मतांमुळे ती अनेकदा चर्चेत असते. शर्लिन चोप्रा बिग बॉस 3 दरम्यान देखील चर्चेत होती.
advertisement
7/10
शर्लिन तिच्या कामापेक्षा तिच्या विधानांमुळे, कमेंट्स आणि ट्विटमुळे जास्त चर्चेत राहते. तिला पडद्यावर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत रोमान्स करायचा आहे असं सांगितलं होतं. ती म्हणाली होती, "मला विद्या बालनसोबत एक इमोशनल, रोमँटीक दृश्य करायला आवडेल. मला ती खूप आवडते. जर ती ऐकत असेल तर मी तिला सांगू इच्छिते, विद्या, मी तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरपेक्षा तुझी चांगली काळजी घेऊ शकते."
advertisement
8/10
'बिग बॉस 3' मध्ये शर्लिनने विचित्र मागणी केली होती. मी कॅमेऱ्यासमोर आंघोळ करायला प्राधान्य देईल, असं म्हणाली होती. निर्मात्यांनी शर्लिन चोप्राची मागणी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला. तिला तीन आठवड्यांत बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं.
advertisement
9/10
प्लेबॉय मॅगझीनसाठी न्यूड पोज देऊन शर्लिन रातोरात प्रसिद्ध झाली होती. असं करणारी ती पहिली भारतीय मॉडेल होती. त्यानंतर मात्र तिनं धक्कादायक स्टेटमेन्ट केलं होतं. ती म्हणाली होती. "बॉलिवूडने मला असं बनवलं. जेव्हा मला काम मिळत नव्हतं तेव्हा मला अडल्ट सीन करावे लागले."
advertisement
10/10
2023 साली शर्लिननं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर एक स्टेटमेन्ट केलं होतं जे खूप चर्चेत आलं होतं. शर्लिन म्हणाली होती, मला यांच्याशी ( राहुल गांधी ) लग्न करायला आवडेल. पण माझी एक अट आहे मी लग्नानंतर आडनाव बदलणार नाही. जर त्यांना हे मान्य असेल तर मी लग्न करेन.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
काँग्रेस नेत्याशी लग्न अन् विद्या बालनसोबत करायचा होता रोमान्स, फिल्म सोडून कॉन्ट्रोवर्सीमुळेच चर्चेत असते अभिनेत्री