Shravan 2024 : यंदाचा श्रावण महिना 'या' तीन राशींसाठी असेल विशेष फलदायी; जीवनातले अडथळे होतील दूर
- Published by:Prachi Dhole
- trending desk
Last Updated:
Shravan 2024 Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा महिना खास असेल. बारापैकी तीन राशींसाठी हा कालावधी अत्यंत शुभ असेल. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
1/6

श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना असतो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. उत्तर भारतीय पंचांगानुसार 22 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्टपासून श्रावण सुरू होईल. आपल्याकडे दक्षिण भारतीय पंचांग प्रचलित आहे. त्यामुळे आपल्याकडे 5 ऑगस्टपासून श्रावण सुरू होत आहे.
advertisement
2/6
दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. यंदा सोमवारी या पवित्र महिन्याला सुरुवात होईल. या महिन्यात भगवान शंकराची विशेष आराधना केली जाते. श्रावणात केलेले पूजापाठ लवकर फलद्रूप होतात असं मानलं जातं. आपल्याकडे तीन सप्टेंबरला श्रावण महिना संपत आहे. या कालावधीत सर्व राशींना अनुकूल किंवा प्रतिकूल फळं मिळतील. कर्क, मकर आणि कुंभ या राशींसाठी श्रावण महिना शुभ असेल.
advertisement
3/6
कर्क : ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना शुभ असेल. या कालावधीत त्यांचं नशीब उजळेल. या राशीचा स्वामी चंद्र असून, तो भगवान शंकराचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे या व्यक्तींना भगवान शंकराची कृपादृष्टी लाभेल. प्रगतीच्या मार्गातले अडसर दूर होतील. या महिन्यात शिवलिंगावर दुग्धाभिषेक करावा.
advertisement
4/6
मकर : ही भगवान शंकराची रास मानली जाते. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर भगवान शंकराची कृपादृष्टी असेल. मकर राशीचा स्वामी शनी आहे. भगवान शंकर हे या राशीच्या व्यक्तींचं आराध्य दैवत असतं. त्यामुळे भगवान शंकराची कृपादृष्टी लाभावी याकरिता श्रावण महिन्यात पाण्यात उडीद मिसळून भगवान शंकराला अभिषेक करावा.
advertisement
5/6
कुंभ : ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या राशीवर त्यांची विशेष कृपा असेल. श्रावण महिन्यात या राशीच्या व्यक्तींनी शिवआराधना करावी. यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. श्रावण महिन्यात मंदिरात जाऊन शिवलिंगावर काळे तीळ घातलेल्या पाण्याने अभिषेक करावा.
advertisement
6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shravan 2024 : यंदाचा श्रावण महिना 'या' तीन राशींसाठी असेल विशेष फलदायी; जीवनातले अडथळे होतील दूर