घरामध्ये येईल सुख-समृद्धी; पारिजातकाचं झाड लावताना घ्या ही काळजी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पारिजातक वनस्पती ही शास्त्रानुसार एक अत्यंत महत्वाची आणि सौंदर्य युक्त वनस्पती आहे.
advertisement
1/9

आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडे आहेत जी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. या वनस्पतींचा आपल्या शरीराला फायदा होतो आणि त्याच बरोबर रोगांपासून मुक्ती मिळते. पारिजातक वनस्पती ही शास्त्रानुसार एक अत्यंत महत्वाची आणि सौंदर्य युक्त वनस्पती आहे.
advertisement
2/9
ही वनस्पती आपल्याला महाराष्ट्र बरोबरच सर्वत्र पाहायला मिळते. तसेच या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे सुगंधी फुल आणि आयुर्वेदामध्ये या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असून या वृक्षाचे महत्त्व वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये सांगितले आहे. या वनस्पतीचा आपल्या काय फायदा होतो? लावताना काय काळजी घ्यावी याबद्दलच पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/9
शुक्र ग्रह आणि पारिजातक : शुक्र म्हणजे आपल्या जीवनातील जीवनशैलीचा सर्वात महत्त्वाचा ग्रह हा ग्रह जर खराब असेल तर नातेसंबंधांमध्ये दुरावा येतो तसेच हा ग्रह खराब असल्यास आळस पैसा कितीही येतो पण टिकत नाही. त्यामुळे तुमचा शुक्र खराब आहे असे यातून निष्पन्न होते, असं ज्योतिषी राजेश जोशी सांगतात.
advertisement
4/9
शुक्र खराब झाल्यास कसे ओळखावे? 1. काम खूप आहे पण आळस जास्त. 2. महागड्या वस्तू हरवणे. 3. शारीरिक आणि मानसिक बळ नसणे.4. वंध्यत्व. 5. राजकीय क्षेत्रात अपयश. 6. अचानक भीती वाटणे. 7. परस्त्री किंवा परपुरुषा बरोबर संबंध वाढणे किंवा खराब होणे.
advertisement
5/9
याद्वारे आपण शुक्र खराब आहे हे ओळखू शकतो. जर आपला शुक्र खराब असेल तर आपण पारिजातकाचे झाड आपल्या उत्तर दिशेला किंवा आग्नेय दिशेला लावून दररोज दिवा लावावा जेणेकरून आपल्याला मानसिक शारीरिक बळ प्रतिष्ठा प्राप्त होते.
advertisement
6/9
दर शुक्रवारी पारिजातकाची फुल महालक्ष्मीला अर्पण केल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते. पारिजातकाच्या झाडाची मूळ शुक्रवारच्या दिवशी चांदीच्या तावीजमध्ये गळ्यामध्ये धारण केल्यास शुक्र ऍक्टिव्ह होऊन आर्थिक स्थिती चांगली होते, असं राजेश जोशी सांगतात.
advertisement
7/9
अनेक लोकांना भ्रमनिराश होऊन शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी तोट्यामध्ये आपण काम करतो म्हणून पारिजातकाची 16 पानं घेऊन त्यावर लाल पेनाने ओम सह शुक्राय नमः लिहून हे पान शुक्रवारच्या दिवशी वडाच्या झाडाला अर्पण केल्यास शेअर मार्केटमध्ये चांगला फायदा होतो हा प्रयोग कमीत कमी आठ शुक्रवार करावा. प्रत्येक गोष्ट मनासारखी व्हावी यासाठी या झाडाचे जास्तीत जास्त लागवड करून पर्यावरण पूरक काम केल्यास चांगला फायदा होतो.
advertisement
8/9
तसेच या झाडाला दर अमावस्या पौर्णिमेला खत गोमित्र अर्पण केल्यास संपूर्ण जग वशमध्ये असा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. पारिजातकाचे तत्व आणि महत्त्व अनन्यसाधारण आहे शुक्र ग्रहासाठी पारिजातक हे वृक्ष महत्त्वाचे आहे. तसेच याला हिंदू धर्मात फार महत्त्वाचे मानले जाते. ही वनस्पती भारतात सर्वत्र पाहिला मिळते, अशी माहिती राजेश जोशी यांनी दिली.
advertisement
9/9
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)