TRENDING:

Railway Update: आता थेट रेल्वेनंच तुळजापूरला जायचं, सोलापूर-धाराशिव मार्गाबाबत मोठं अपडेट

Last Updated:

Railway Update: तुळजापूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे रेल्वे संपर्क व्हावा, अशी मागणी दीर्घकाळापासून होत होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: नुकतेच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेचं जाळं विस्तारण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर–तुळजापूर–धाराशिव दरम्यान देखील रेल्वे धावणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्यापैकी 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन आदेश 6 फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला गती मिळाली आहे.
Railway Update: आता थेट रेल्वेचं तुळजापूरला जायचं, सोलापूर-धाराशिव मार्गाबाबत मोठं अपडेट
Railway Update: आता थेट रेल्वेचं तुळजापूरला जायचं, सोलापूर-धाराशिव मार्गाबाबत मोठं अपडेट
advertisement

तुळजापूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून, येथे रेल्वे संपर्क व्हावा, अशी मागणी दीर्घकाळापासून होत होती. मात्र उत्पन्नाच्या दृष्टीने हा मार्ग परवडणारा नसल्याचा (नॉट फिजिबल) शेरा मारत रेल्वे प्रशासनाने हा प्रकल्प अडगळीत टाकला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर 2019 साली हा प्रकल्प रेल्वेच्या पिंक बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी प्रकल्पाची एकूण किंमत 904 कोटी 92 लाख रुपये इतकी होती.

advertisement

होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट, 209 विशेष गाड्या धावणार, पाहा मार्ग

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

तत्कालीन महायुती सरकारने प्रकल्पाच्या 50 टक्के खर्चाची जबाबदारी स्वीकारत 452 कोटी 46 लाख रुपयांचे दायित्व घेतले होते. दरम्यान, प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून, सध्या या रेल्वेमार्गाची एकूण किंमत 3295 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे दायित्व वाढून 1647 कोटी रुपये झाले आहे. यापैकी 40 कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, आता मंजूर झालेल्या 150 कोटी रुपयांमुळे प्रकल्पाच्या कामाला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Railway Update: आता थेट रेल्वेनंच तुळजापूरला जायचं, सोलापूर-धाराशिव मार्गाबाबत मोठं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल